शहरं
Join us  
Trending Stories
1
"केस नसताना कंगवा फिरणारे खूप..."; मुख्यमंत्रि‍पदावरून गडकरींचा मविआच्या नेत्यांना चिमटा
2
व्यापारी नेहमी आपल्या फायद्यासाठी खोटे बोलतो; संजय राऊतांच्या विधानाने वाद, माफीची मागणी
3
Sharad Pawar : "संविधानाची चिरफाड करण्याचा भाजपचा डाव"; शरद पवारांचा घणाघाती आरोप
4
"त्याला काय करायचंय? विराट-रोहितबद्दल बडबड करण्यापेक्षा पॉन्टींगने..."; गौतम गंभीर संतापला!
5
Maharashtra Election 2024: विधानसभेचा पहिला ओपिनियन पोल, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
6
धनंजय मुंडेंनी कमळ घेतलं असतं तर बरं झालं असतं, पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खंत
7
"मारायला हत्यार कशाला?"; शरद केळकरच्या 'रानटी'चा ट्रेलर रिलीज, संजय नार्वेकरांचा भयंकर खलनायक
8
धर्मयुद्ध, व्होट जिहादवरून ओवैसी संतापले; फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत म्हणाले...
9
रोहित-विराटचं नाही टेन्शन; KL राहुलकडे टॅलेंट! ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी काय म्हणाला गंभीर?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'धर्माचं आम्ही बघून घेतो, तुम्ही काय कामं केली ते सांगा'; भावांच्या प्रचारासाठी रितेश देशमुख मैदानात
11
गोलिगत धोका अन् बटनाने टेंगुळ...! रितेश देशमुखची धाकट्या भावाच्या प्रचारात तुफान फटकेबाजी
12
Baba Siddique : ४५ जणांवर करडी नजर; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील मुख्य शूटरचं कसं सापडलं लोकेशन?
13
लोकप्रिय अभिनेत्रीच्या घरातील बाथरुमच्या भिंतीत सापडलेले १२ लाख, कोर्टात दिली खोटी साक्ष अन्...
14
वक्फ बोर्डाविरोधात हजारो चर्च एकवटले; केरळमध्ये घडला अनोखा प्रकार, गावकरी संतप्त
15
न्यायमूर्ती संजीव खन्ना देशाचे नवे सरन्यायाधीश! राष्ट्रपती भवनात पार पडला शपथविधी
16
'या' सुविधा तुम्ही पेट्रोल पंपावर मोफत वापरू शकता, वाचा सविस्तर...
17
माझे घर नागपूरच, अद्याप मुंबईत स्वत:चे घर नाही; देवेंद्र फडणवीस यांची दक्षिण-पश्चिमच्या मतदारांना भावनिक साद
18
"महायुती १७५ हून अधिक जागा जिंकणार, तर बारामतीत...’’, अजित पवारांचा दावा
19
BSNL चा धमाकेदार प्लॅन! 130 दिवसांपर्यंत मिळेल हाय-स्पीड डेटा आणि बरेच काही...
20
मर्डर मिस्ट्री! दिरावर जीव जडल्याने नवऱ्याचा काढला काटा; ८ महिन्यांनी असा झाला पर्दाफाश

परभणी : पाच लाख शेतकऱ्यांनी भरला पीक विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 12:36 AM

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ५ लाख २५ हजार ४८४ शेतकºयांनी यावर्षीच्या खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मूग, उडीद आदी पिकांचा विमा इफ्को टोकियो विमा कंपनीकडे ३१ जुलैपर्यंत भरला आहे. जिल्हाबंद, सर्व्हर डाऊन आदी कारणांनी जिल्ह्यातील अनेक शेतकरी पीक विमा भरण्यापासून वंचित राहिल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ५ लाख २५ हजार ४८४ शेतकºयांनी यावर्षीच्या खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मूग, उडीद आदी पिकांचा विमा इफ्को टोकियो विमा कंपनीकडे ३१ जुलैपर्यंत भरला आहे. जिल्हाबंद, सर्व्हर डाऊन आदी कारणांनी जिल्ह्यातील अनेक शेतकरीपीक विमा भरण्यापासून वंचित राहिल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यातील शेतकºयांची भिस्त ही खरीप हंगामातील पिकांवर अवलंबून असते; परंतु, गेल्या चार वर्षापासून सुलतानी व अस्मानी संकटामुळे शेतकºयांनी खरीप हंगामात पेरणी व लागवड केलेल्या पिकावर केलेला खर्चही उत्पन्नातून निघत नाही.शेतकºयांना आर्थिक बळ देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना अंमलात आणली. या योजनेंतर्गत पिकांच्या नुकसानीपोटी शेतकºयांना नुकसान भरपाई दिली जाते.२०१६ मध्ये जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच ४२९ कोटी रुपयांच्या पीक विम्याची रक्कम प्राप्त झाली होती. त्यामुळे नैसर्गिक संकटाने शेतकºयांची पिके हिरावून नेली असली तरी विमा कंपनीने केलेल्या मदतीमुळे अनेक शेतकºयांना आर्थिक पाठबळ मिळाले; परंतु, २०१७ मध्ये रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने शेतकºयांच्या पिकांचे नुकसान होऊनही मदत नाकारली. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. त्यानंतर राज्य शासनाने याची दखल घेऊन रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडून जिल्ह्याचे काम काढून २०१८ वर्षासाठी या खरीप हंगामातील पिकांचा विमा उतरविण्यासाठी इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीकडे देण्यात आला. त्यासाठी १ ते ३१ जुलै अशी मुदत देण्यात आली. अखेरच्या दिवशी मंगळवारपर्यंत जिल्ह्यातील ५ लाख २५ हजार ४८४ शेतकºयांनी आपल्या पिकाचा विमा उतरविला आहे. दरम्यान, जिल्हाबंद, सर्व्हर डाऊन या तांत्रिक कारणामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी विमा कंपनीने दिलेल्या मुदतीत आपले प्रस्ताव दाखल करु शकले नाहीत. त्यामुळे विमा कंपनीने किमान ८ आॅगस्टपर्यंत विमा प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदत द्यावी, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकºयांमधून होत आहे.सीएससी केंद्रांचा पुढाकारप्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत यावर्षीपासून आॅनलाईन अर्ज दाखल करण्याचे आवाहन विमा कंपनीने केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत आतापर्यंत ५ लाख २५ हजार ४८४ शेतकºयांनी विमा प्रस्ताव दाखल केले आहेत. सीएससी केंद्रांनी ४ लाख ६८ हजार ५४७ शेतकºयांचा २१ कोटी २२ लाख ४४ हजार ८५५ रुपयांचा पीक विमा भरुन घेतला आहे. त्या पाठोपाठ जिल्ह्यातील बँकांनी ४४ हजार ४९५ शेतकºयांचा २ कोटी ९४ लाख ४८ हजार ४४३ रुपयांचा पीक विमा भरुन घेतला आहे. तर १२ हजार ४४२ शेतकºयांनी डिजीटल यंत्रणेचा वापर करुन ६५ लाख ८४ हजार ७३१ रुपयांचा विमा भरला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सीएसीसी केंद्रांनी पीक विमा प्रस्ताव स्वीकारण्यास पुढाकार घेतल्याचे वरील आकडेवारीवरुन दिसून येत आहे.मंगळवारी शेतकºयांनी केली गर्दीजिल्ह्यातील पीक विम्याचे काम पाहणाºया इफ्को टोकियो या कंपनीने ३१ जुलै ही विमा प्रस्ताव सादर करण्यास मुदत दिली होती. गेल्या काही दिवसांपासून कापूस पिकावर विविध अळ्यांनी हल्ला चढविला आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशीच म्हणजे मंगळवारी अनेक शेतकºयांनी अळ्यांची धास्ती घेऊन कापूस पिकाचा पीक विमा उतरविण्यासाठी सीएसी केंद्र, बँक व डिजीटल यंत्रणेकडे गर्दी केल्याचे दिसून आले.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा