लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील तहसील कार्यालयातील नोंद वहीत खाडाखोड करून बनावट जात प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीतील गुन्हा दाखल झालेले पाचही आरोपी आठवडाभरापासून पोलिसांना सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़परभणी येथील तहसील कार्यालयातील कर्मचाºयांना हाताशी धरून संबंधित नोंदवहीत खाडाखोड करीत बनावट जात प्रमाणपत्र देणाºया टोळीचा पोलीस व महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने ११ ठिकाणी छापे टाकून ६ नोव्हेंबर रोजी पर्दा फाश केला होता़ या प्रकरणी पाच जणांविरूद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ गुन्हा दाखल झालेले पाचही आरोपी आठवडाभरापासून मोकाट आहेत़ या आरोपींचा ठावठिकाणा शोधण्यात पोलिसांना यश आलेले नाही़ लाखो रुपयांची उलाढाल असलेल्या या प्रकरणात महसूल, समाजकल्याण विभागातील काही अधिकारी व कर्मचारी गुंतले असल्याने या प्रकरणाची राज्यस्तरावर चर्चा होवू लागली आहे़ या प्रकरणात पोलिसांनी ६ नोव्हेंबर रोजी रात्री सय्यद इलाही व शेख शफाहेद शेख फारूख या दोन आरोपींना अटक केली होती़ त्यांना ७ नोव्हेंबर रोजी न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने १२ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती़ त्यानुसार सोमवारी या दोन्ही आरोपींना पुन्हा न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना १६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत़ज्या आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल झाले त्यांनाच अटक होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़ शिवाय पोलिसांमध्ये दाखल फिर्यादीमध्ये तहसील कार्यालयातील कर्मचाºयांचाही उल्लेख आहे़; परंतु, संबंधित कर्मचारी कोण? त्याला कोणी मदत केली? याबाबतची माहिती पुढे आलेली नाही़ त्यामुळे या प्रकरणात महसूलमधील कोणत्या कर्मचाºयाने बनावट जात प्रमाणपत्र देणाºया टोळीला मदत केली याचा पर्दाफाश होणे आवश्यक आहे़ त्यामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे़बाबाजानी दुर्राणी यांच्या आरोपाने खळबळराष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ़ बाबाजानी दुर्राणी यांनी तक्रार केल्यानंतर या प्रकरणाचे बिंग फुटले़ त्यानंतर महसूल व पोलीस प्रशासनाने कारवाई केली़ आ़ दुर्राणी यांनी या प्रकरणाचे धागेदोरे थेट जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयापर्यंत असल्याचा आरोप केला आहे़ त्यामुळे या आरोपानुसार पोलिसांनी तपास सूत्रे फिरविणे आवश्यक आहे़ या प्रकरणात ज्या व्यक्तींवर गुन्हे दाखल झाले आहेत, त्या व्यक्ती जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय परिसरात सातत्याने गेल्या अनेक महिन्यांपासून वावरत होत्या़ त्यामुळे या कार्यालयाच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करावी, अशी मागणीही आ़ दुर्राणी यांनी केली आहे़ त्यामुळे पोलिसांनी त्या दृष्टीकोणातूनही तपास केल्यावर या प्रकरणात मोठे मासे गळाला लागू शकतात़
परभणी : बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणातील पाचही आरोपी पोलिसांना सापडेनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 11:48 PM