लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : कल्याण-मुंबई नावाचा मटका जुगार घेणाºया पाच जणांवर ५ जुलै रोजी रात्री उशिराने गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांच्या ताब्यातील रोख रकमेसह १० हजार ८२० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.गंगाखेड शहरातील अवैध धंद्यावर कार्यवाही करण्यासाठी ५ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास फिरत असलेल्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला एक जण मोबाईल व्हॅटस्अॅपवर कल्याण नावाचा मटका घेत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीवरून पथकाने शहरातील मोंढा परिसरातील एका व्यापारी संकुलनासमोर उभ्या असलेल्या बालाजी बापूराव राठोड (वय २८, रा. गोदावरी तांडा) यास पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळील मोबाईलच्या व्हॅटस्अॅपवर कल्याण नावाच्या मटक्याच्या आकडे लावलेल्या चिठ्या व रोख ४३० रुपये मिळवून आले. त्याच्या जवळील ३ हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा एकूण ३ हजार ४३० रुपयांचा ऐवज जप्त करून कोणासाठी मटका घेतो, अशी विचारणा केली. तेव्हा परभणी तालुक्यातील साळापुरी येथील राठोड यांच्या सांगण्यावरून मटका घेत असल्याचे सांगितले. त्यावरून जमादार शंकर मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बालाजी राठोड व देवा राठोड यांच्या विरुद्ध जुगार कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास जमादार रंगनाथ देवकर हे करीत आहेत. तसेच गंगाखेड पोलीस ठाण्यातील डी.बी. पथकाचे कर्मचारी अण्णा मानेबोईनवाड यांनी सायंकाळी ७ च्या सुमारास जिल्हा बँक शाखेसमोरील पानटपरीवर धाड टाकून जितेंद्र इचके, कल्याणीअप्पा, भारत जाधव (रा. सर्व गंगाखेड) यांना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळील रोख २ हजार ३९० रुपये, ५ हजारांचा मोबाईल, मटका, जुगाराचे साहित्य असा एकूण ७ हजार ३९० रुपयांचा ऐवज जप्त केला. याबाबत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
परभणी: मटका घेणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2019 11:08 PM