शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
2
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
3
"मतदानाची वेळ संपल्यावर ७.८३ टक्के मतांची वाढ झाली कशी?", नाना पटोलेंचा निवडणूक आयोगाला सवाल
4
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
5
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
6
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
7
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
8
Ajmer Sharif: "आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले 
9
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
10
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी
11
शरद पवार गटाला ७२ लाख मते पण १०च जागा जिंकले, अजितदादा गटाला ५८.१ लाख मते पण ४१ जागा जिंकले
12
प्रकाश आंबेडकरांना सोबत न घेणे भोवले? मविआला २० ठिकाणी फटका; सर्वाधिक नुकसान शरद पवारांचे!
13
Blast in Delhi: राजधानी दिल्लीत मोठा स्फोट; तपास यंत्रणा अलर्ट मोडवर
14
"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 
15
सलग दुसऱ्यांदा शेअर देतेय 'ही' कंपनी, रेकॉर्ड डेट उद्या; ५० रुपयांपेक्षा कमी किंमत
16
खळबळजनक! गुजरातमध्ये सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांची मुद्दाम केली अँजिओप्लास्टी
17
सणासुदीच्या काळात Indian Railway मालामाल; तिकीट विक्रीतून कमावले 12 हजार कोटी!
18
IND vs AUS: वर्षभर 'फ्लॉप शो', मात्र ऑस्ट्रेलियात 'विराट' कमबॅक; गावसकरांनी सांगितलं शतकामागचं रहस्य
19
ऑस्ट्रेलियन PM अँथनी अल्बानीज यांनी घेतली टीम इडियाची भेट; किंग कोहलीसोबतचा संवाद चर्चेत (VIDEO)
20
BSNL ची आपल्या कोट्यवधी ग्राहकांना मोठी भेट; कंपनीने सुरू केली HD कॉलिंग सेवा...

परभणी : दमदार पावसाने ओढ्या-नाल्यांना पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2019 11:46 PM

यावर्षीच्या संपूर्ण पावसाळ्यात पहिल्यांदाच शनिवारी रात्री जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस झाल्याने ओढे आणि नाले खळखळून वाहिले असून, या पावसामुळे भूजल पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे़ परिणामी काही अंशी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, अशी आशा निर्माण झाली आहे़ रविवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत सरासरी ४० मिमी पावसाची नोंद झाली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : यावर्षीच्या संपूर्ण पावसाळ्यात पहिल्यांदाच शनिवारी रात्री जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस झाल्याने ओढे आणि नाले खळखळून वाहिले असून, या पावसामुळे भूजल पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे़ परिणामी काही अंशी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, अशी आशा निर्माण झाली आहे़ रविवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत सरासरी ४० मिमी पावसाची नोंद झाली आहे़शनिवारी दिवसभर जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू होती़ रात्री ११ वाजेच्या सुमारास परभणी शहर व परिसरात १५ ते २० मिनिटे जोरदार पाऊस झाला़ त्यानंतरही पावसाचा जोर कायम होता़ रविवारी पहाटेही सूर्यदर्शन झाले नाही़ पावसाळी वातावरण निर्माण झाले होते़ परभणी शहरासह तालुक्यांमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे़ पालम तालुक्यात दमदार पाऊस झाला असून, पिकांना जीवदान मिळाले आहे़ पाथरी तालुक्यातही सरासरी ५१़३३ मिमी पाऊस झाला आहे़ मानवत, गंगाखेड, पूर्णा या तालुक्यांमध्येही जोरदार पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे़चारठाण्यात मुसळधारचारठाणा व परिसरात रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पाऊण तास मुसळधार पाऊस झाला. मागील २०-२२ दिवसांपासून या परिसरात पावसाने दडी मारली होती. १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पाऊण तास मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला.पाथरीत प्रथमच जोरदारपाथरी तालुक्यात ३१ आॅगस्ट रोजी या पावसाळ्यातील पहिलाच जोरदार पाऊस झाला. रविवारीही पावसाची रिपरिप सुरू होती. या पावसामुळे सोयाबिन, कापूस, तूर या पिकांना दिलासा मिळाला आहे. तालुक्यात सरासरी ५१.३३ मि.मी. पाऊस झाला आहे.चार मंडळांत अतिवृष्टी६५ मिमी पेक्षा अधिक पाऊस झाल्यास महसूल प्रशासन अतिवृष्टीची नोंद घेते़ शनिवारी रात्री जिल्ह्यातील ४ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे़ त्यात पाथरी मंडळात सर्वाधिक ८० मिमी पाऊस झाला. सेलू तालुक्यातील देऊळगाव मंडळात ७५ मिमी, गंगाखेड तालुक्यातील माखणी मंडळात ७५ मिमी आणि जिंतूर तालुक्यात सावंगी म्हाळसा मंडळामध्ये ६८ मिमी पाऊस झाला़झरी मंडळात दोन दिवसांत ११० मिमी पाऊसझरी- परभणी तालुक्यातील झरी मंडळामध्ये शुक्रवार आणि शनिवारी या दोन दिवसांत ११० मिमी पावसाची नोंद झाली आहे़ झरीपासून वाहणाऱ्या लेंडी नदीवरील बंधारे पावसाच्या पाण्याने तुडूंब भरले आहेत़ अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे़ मागील ४८ तासांत या मंडळात ११० मिमी पावसाची नोंद झाली आहे़ झरी मंडळाची वार्षिक सरासरी ९२२ मिमी आहे़ तीन महिन्यांत या मंडळात ४७३़६ मिमी पाऊस झाला आहे़ झरीची जीवन वाहिनी म्हणून ओळखल्या जाणाºया लेंडी नदीला पाणी आल्याने या नदीवरील बंधारे ओव्हरफ्लो झाले आहेत़पालमममध्ये : लेंडी नदीला पूर४पालम तालुक्यात रात्री १२ वाजेपासून पावसाला प्रारंभ झाला़ पहाटे ४ वाजेपर्यंत हा पाऊस बरसत होता़ या पावसामुळे शहराजवळून वाहणाºया लेंडी नदीला पूर आल्याने १ सप्टेंंबर रोजी नदीपलीकडील १२ गावांमधील ग्रामस्थांचा शहराशी संपर्क तुटला होता़४दुपारी २ वाजेपर्यंत पुलावर पाणी असल्याने वाहतूक ठप्प होती़ दुपारी २ नंतर पुलावरून वाहतूक सुरू झाली़ पालम ते जांभूळबेट या रस्त्यावर शहरापासून अर्धा किमी अंतरावर लेंडी नदीच्या पात्रात कमी उंचीचा पूल आहे़ या पुलाच्या नळकांड्या चिखलाने भरून जातात़४त्यामुळे पाणी पुलावरून वाहते़ रविवारी पहाटे ४ वाजेपासून पुलावरील वाहतूक बंद होती़ पुलावरून ५ फुट पाणी वाहत असल्याने फळा, आरखेड, घोडा, सोमेश्वर, उमरथडीसह इतर १२ गावांचा संपर्क तुटला होता़मानवत तालुक्यातील ८२ मिमी पाऊसमानवत तालुक्यात शनिवारी रात्री १०़३० ते १२़३० या दोन तासांत जोरदार पाऊस झाला़ कोल्हा, मानवत आणि केकरजवळा या तिन्ही मंडळांत मिळून ८२ मिमी पाऊस झाला आहे़ या पावसामुळे तालुक्यातील पिकांना जीवदान मिळाले आहे़ प्रथमच ओढे-नाल्यांना पाणी आले.दूधना वाहू लागली४झरी- पावसाअभावी दोन वर्षांपासून दूधना नदीचे पात्र कोरडेठाक आहे़ मागील वर्षी परभणी, पूर्णा या शहराला पिण्याचे पाणी देण्यासाठी निम्न दूधना प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडल्याने दूधना नदी वाहती झाली होती़ परंतु, त्यानंतर संपूर्ण पावसाळ्यातही नदीचे पात्र कोरडेठाक होते़ शनिवारी रात्री झालेल्या पावसाने झरी परिसरात दूधना नदीलाही पाणी आले आहे़ ही नदी वाहती झाली असून, आणखी पावसाची आवश्यकता आहे़जिल्ह्यात सरासरी ४०़७० मिमी पाऊसशनिवारी रात्री झालेल्या पावसाची नोंद महसूल प्रशासनाने घेतली आहे़ रविवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यामध्ये सरासरी ४०़७० मिमी पाऊस झाला़ त्यात सोनपेठ तालुक्यात सर्वाधिक ६१ मिमी पावसाची नोंद झाली आहे़त्या खालोखाल गंगाखेड तालुक्यात ५७़५० मिमी, पाथरी तालुक्यात ५१़३३ मिमी, पूर्णा ४०़८० मिमी, पालम ३९ मिमी, जिंतूर ३५़१७ मिमी, सेल ३४ मिमी, मानवत २७़३३ आणि परभणी तालुक्यात २०़२० मिमी पावसाची नोंद झाली आहे़यावर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यात आतापर्यंत ३५३़३६ मिमी पाऊस झाला असून, पूर्णा तालुक्यात सर्वाधिक ४६२ मिमी, मानवत ३८५, सोनपेठ ३७७, गंगाखेड ३७५, जिंतूर ३४१, पाथरी ३३४, परभणी ३०२, पालम ३०१ आणि सेलू तालुक्यात ३०० मिमी पाऊस झाला आहे़ वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत ४५़६ टक्के पाऊस झाला आहे़वडी ओढ्याला पाणी४पाथरी- शनिवारी रात्री तालुक्यात दमदार पाऊस झाल्याने ओढे-नाल्यांना पाणी आले आहे़ वडी शिवारातील नाला या पावसामुळे पहिल्यांदाच दुथडी भरून वाहिला़

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसfloodपूर