लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शेतकºयांची संपूर्ण कर्जमुक्ती करून सातबारा कोरा करावा, यासह इतर विविध मागण्यांसाठी १९ मार्च रोजी शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन केले़सकाळी ११ वाजेपासून या आंदोलनाला प्रारंभ झाला़ जिल्हाभरातून विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी, शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते़ राज्य व केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे देशात व राज्यात शेतकºयांच्या आत्महत्येचे सत्र सुरू आहे़ यवतमाळ जिल्ह्यातील साहेबराव कर्पे यांनी त्यांची पत्नी व चार मुलांसह १९ मार्च १९८६ रोजी पहिली सामूहिक आत्महत्या केली होती़ तेव्हापासून आजतागायत ७६ हजारांहून अधिक शेतकºयांच्या आत्महत्या झाल्या आहेत़ सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे १ जून २०१७ रोजी राज्यातील शेतकरी संपावर गेले होते़ त्यानंतर शासनाने कर्जमाफीची घोषणा केली़ परंतु, कर्जमाफीच्या योजनेत अटी व शर्ती टाकून शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसण्यात आले़ तेव्हा शेतकºयांची संपूर्ण कर्जमाफी करावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करून शेतीमालाची आधारभूत किंमतीप्रमाणे खरेदी करावी, आदी मागण्या करण्यात आल्या़ या आंदोलनात बंडू सोळंके, विलास बाबर, माऊली कदम, संतोष देशमुख, प्रा़ सुरेंद्र रोडगे, अनंत कदम, लिंबाजी कचरे, अब्दुल हफीज, रामकृष्ण शेरे, शेख अब्दुल, उत्तम धुमाळ, नारायण काकडे आदींसह संघटनांचे बहुसंख्य प्रतिनिधी, शेतकरी सहभागी झाले होते़
परभणी : शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:28 AM