लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : बसस्थानकामधील प्लॅटफॉर्म परिसरातील मोकळ्या जागेत मोठ मोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात बसस्थानक परिसर अक्षरश: जलमय झालेले दिसून येत आहे. दररोज ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या किमान ३ हजार विद्यार्थिनींसह प्रवाशांना चिखल व पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे या बसस्थानकाला तळ्याचे स्वरुप आल्याचे दिसून येत आहे.पाथरी येथे राष्ट्रीय स्वरुप ६१ या रस्त्यावर बसस्थानक आहे. पाथरी, मानवत आणि सेलू या तीन तालुक्यांसाठी याच ठिकाणी मुख्य आगार आहे. याच आगारातून तीन्ही तालुक्यातील एस.टी.महामंडळाच्या बसेसचे नियोजन केले जाते. पाथरी येथील बसस्थानकात प्रवेश करण्यासाठी असलेल्या रस्त्यावरच बसस्थानकाची दुरवस्था दिसून येते. बाहेरुन येणाºया बसगाड्या ज्या ठिकाणी उभ्या केल्या जातात. त्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यामध्ये मागील आठ दिवसांपासून शहरात सुरु असलेल्या रिमझिम पावसामुळे मोठे पाणी साचले आहे. परिणामी बसस्थानक परिसर चिखलमय झाला आहे. बसस्थानकात बसगाडीने प्रवेश करताच प्रवाशांना दुरवर जावे लागत आहे. जेणेकरुन चिखल अंगावर येणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. त्याच बरोबर अनेक वेळा प्रवासी पाय घसरुन पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रवासी बसस्थानकाच्या दुरवस्थेमुळे बेजार आहेत. दुसरीकडे ग्रामीण भागातून पाथरी शहरात येणाºया शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठी संख्या आहे. मानव विकासच्या बसमधून जवळपास ७०० मुली शिक्षणासाठी शहरात येतात. तसेच विद्यार्थ्यांचीही संख्या मोठी असल्याने दररोज तीन हजारापेक्षा अधिक विद्यार्थी बसने शहरात दाखल होतात. या विद्यार्थ्यांना बसस्थानकावरील साचलेले पाणी व चिखलातून मार्गक्रमण करुन बसस्थानकाबाहेर पडावे लागत आहे.त्यामुळे विभागीय नियंत्रकांनी याकडे लक्ष देऊन अनेक वर्षापासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या या बसस्थानक परिसराची दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवासी, शालेय विद्यार्थी व तालुकावासियांतून होत आहे.बसचालकांना करावी लागते कसरत४राष्ट्रीय महामार्ग ६१ हा रस्ता शहरातून जातो. या रस्त्यावर दुभाजक टाकण्यात आले आहेत व त्यावर जाळ्या बसविण्यात आल्या आहेत.४बसस्थानकातून बस बाहेर पडताना दुभाजक बसविण्यात आल्याने प्रत्येक बस ही विरुद्ध दिशेने न्यावी लागत आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. बसस्थानकातील गाड्या पाण्यातून बाहेर काढताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.बसस्थानक परिसराच्या मजबुतीकरणाचे काम मंजूर करण्यात आले आहे. विभागीय पातळीवरुन त्या कामाची निविदा निघालेली असल्याने हे काम लवकरच सुरु होईल.-एल.एम.चौरे, आगारप्रमुख
परभणी : पाथरी बसस्थानकाला आले तळ्याचे स्वरुप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2019 12:27 AM