लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : विधानसभा निवडणुकीमध्ये आचारसंहिता भंग होऊ नये, यासाठी स्थापन केलेल्या भरारी, स्थिर पथकांसह पोलीस प्रशासनाने २५ दिवसांमध्ये ४ लाख ६८ हजार ३१३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ त्यामध्ये देशी, विदेशी दारुसह दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा समावेश आहे़विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेला २१ सप्टेंबरपासून प्रारंभ झाला़ निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होताच आचारसंहिता लागू झाल्याने जिल्हा प्रशासनाने आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी विविध पथकांची स्थापना केली़ या पथकांनी जिल्हाभरात कामकाज सुरू केले आहे़ जिल्ह्यातील चारही मतदार संघामधील प्रमुख मार्गावर चेकपोस्ट उभारले असून, या ठिकाणी वाहनांची कसून तपासणी केली जात आहे़ तसेच भरारी पथकाच्या माध्यमातून जिल्ह्यात होत असलेल्या अवैध दारू विक्री व इतर प्रकरणांवर नजर ठेवली जात आहे़ याशिवाय पोलीस प्रशासनही आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी काटेकोर प्रयत्न करीत आहे़जिल्हा प्रशासनाने बुधवारी २१ सप्टेंबरपासून केलेल्या कारवार्इंचा आढावा जाहीर केला आहे़ त्यानुसार भरारी पथकाने आतापर्यंत १ लाख १७ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़तर पोलीस प्रशासनानेही ९५ हजार ९०६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला़ त्यामध्ये जिंतूर मतदार संघात २४ हजार ९६० रुपयांच्या दारूसह ८४ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल याच मतदार संघात अन्य एका कारवाईत २४ हजार १७० रुपयांचे साहित्य जप्त केले आहे़ झरी येथून एका वाहनातून ५३ हजार ३३० रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत़या रकमेसंदर्भात संबंधितांनी पुरावे दिले नसल्याने ही रक्कम जप्त करण्यात आली़ तसेच जिंतूर येथे केलेल्या कारवाईत ४२ हजार ५७६ रुपयांचे निवडणूक साहित्यही या पथकाने जप्त केले आहे़
परभणी : साडेचार लाखांचा मुद्देमाल केला जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 11:00 PM