शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

परभणी : दुर्लक्षामुळेच बनावट खतांची फसवेगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:13 AM

शहर परिसरातील खानापूर शिवारात स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने बनावट खत व शेती उपयोगी औषधींचा साठा जप्त करण्याची कारवाई केली असली तरी ज्या कृषी विभागावर हा सर्व प्रकार रोखण्याची जबाबदारी आहे तो कृषी विभाग चक्क साखर झोपेत असल्याचे पहावयास मिळत आहे़ या संदर्भात तपासणी करण्यासाठी या विभागाकडे स्वतंत्र यंत्रणा असतानाही या विभागाने त्याकडे कानाडोळा केल्याने कृषी विभागाच्या आशीर्वादानेच जिल्ह्यात बनावट खताचा लबाडीचा धंदा सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहर परिसरातील खानापूर शिवारात स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने बनावट खत व शेती उपयोगी औषधींचा साठा जप्त करण्याची कारवाई केली असली तरी ज्या कृषी विभागावर हा सर्व प्रकार रोखण्याची जबाबदारी आहे तो कृषी विभाग चक्क साखर झोपेत असल्याचे पहावयास मिळत आहे़ या संदर्भात तपासणी करण्यासाठी या विभागाकडे स्वतंत्र यंत्रणा असतानाही या विभागाने त्याकडे कानाडोळा केल्याने कृषी विभागाच्या आशीर्वादानेच जिल्ह्यात बनावट खताचा लबाडीचा धंदा सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे़परभणी जिल्ह्यामध्ये २ हजार २४८ कृषी दुकानांमधून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणे, खते व कीटकनाशकांची विक्री केली जाते़ या दुकानांतून शेतकºयांना मिळणारा माल हा शुद्ध व चांगल्या प्रतीचा आहे का? हे तपासण्याची जबाबदारी कृषी विभागाची आहे़ यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयांतर्गत जिल्हा गुण नियंत्रक निरीक्षण व जिल्हा परिषदेंतर्गत जिल्हा कृषी विकास अधिकारी कार्यालय कार्यरत आहे़ या अंतर्गत जिल्ह्यामध्ये १३ तपासणी अधिकारी आहेत़ यामध्ये ९ तालुका कृषी अधिकारी, एक उपविभागीय कृषी अधिकारी व एक तंत्र अधिकाºयाचा समावेश आहे़ खरीप हंगामाच्या सुरुवातीला जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्री करणाºया २ हजार २४८ दुकानांची तपासणी करणे आवश्यक आहे; परंतु, यातील फक्त ६४० दुकानांचीच तपासणी करण्यात आली़ त्यामध्ये किटक नाशकांची ७८४ पैकी ७९ दुकाने तपासण्यात आली़ तर खतांच्या ७२५ पैकी १४० दुकानांची तपासणी करण्यात आली़ त्याचबरोरबर ७३९ बियाणे विक्री करणाºया दुकानांपैकी ४२१ दुकानांची तपासणी करण्यात आली़ १३ अधिकाºयांचा लवाजमा उपलब्ध असतानाही १ हजार ६०८ दुकानांची तपासणी करण्याची तसदी या अधिकाºयांना घ्यावीशी वाटली नाही़ या संदर्भात जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक सामाले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वर्षभरात सर्व दुकाने तपासण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले; परंतु, कृषी निविष्ठांची तपासणी खरीप व रबी हंगामाच्या प्रारंभीच होणे आवश्यक आहे़ कारण त्याचवेळेला बळीराजा आपल्या वर्षभराच्या मेहनतीचे फळ मिळावे, यासाठीची स्वप्ने पाहून कृषी निविष्ठांची खरेदी करीत असतो़ याची जाण मात्र अधिकाºयांना नसल्याचे दिसून येते़विशेष म्हणजे ज्या ६४० दुकानातील नमुन्यांची तपासणी करण्यात आली़ त्यातील फक्त २१ नमुने काढून ते प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले़ प्रयोगशाळेने या नमुन्यांबाबत काय अहवाल दिला हे मात्र कृषी विभागाचे अधिकारी आणि तपासणी करणाºया प्रयोगशाळेतील अधिकाºयांनाच माहित आहे़ एकीकडे शेतकºयांना देण्यात येणाºया कृषी निविष्ठांची व्यवस्थित तपासणी होत नसताना दुसरीकडे शेतकºयांना देण्यात येणारी बियाणे, खते, किटकनाशके कोणती आहेत? ती कशी हाताळावी याचे प्रशिक्षण शेतकºयांना देणे गरजेचे होते; परंतु, काही मोजक्याच शेतकºयांना याचे प्रशिक्षण देऊन कृषी विभागाने हातवर केले आहेत़ त्याचबरोबर जिल्ह्याच्या कानाकोपºयामध्ये कुठे बनावट खत, औषधी तयार करण्याची कारखाने आहेत का? याचा तपास करून शोध घेणे गरजेचे असताना जिल्हा परिषदेचा कृषी विभाग व जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातील अधिकारी, कर्मचाºयांनी असा कोणताच शोध घेतला नाही़ अखेर २१ जुलै रोजी परभणी शहरातील खानापूर ते पिंगळी रस्त्यावर कॅनॉलच्या पुढे एका पत्र्याच्या शेडमध्ये बनावट खत, औषधी तयार करणाºया कारखान्याचा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांच्या पथकाने पर्दाफाश केला़ त्यानंतर कृषी विभागातील अधिकाºयांना या कारखान्याची कानकून लागली़ त्यानंतर धावत जाऊन शनिवारी पहाटे ६ वाजेपर्यंत त्या कारखान्याचा पंचनामा करण्यात आला. या सर्व प्रकरणात कृषी विभागाची निष्क्रियता बनावट कृषी निविष्ठा तयार करणाºयांच्या पथ्थावर पडल्याचे दिसून येत आहे.२९ लाखांची बनावट खत, औषधी जप्तदरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी शहरातील खानापूर शिवारातील गोदामात टाकलेल्या धाडीत जप्त केलेली बनावट खते, किटकनाशके आदींची मोजदाद शनिवारी पूर्ण झाली़ त्यानुसार २८ लाख ७६ हजार ९१० रुपयांचा बनावट कृषी निविष्ठांचा साठा आढळून आल्याचे स्पष्ट झाले़ जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांना पोलिसांनी घटनास्थळी पाचारण केले होते़ त्यांनी याबाबतची पाहणी केली़ त्यानंतर या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुनिल गोपिनवार यांच्या फिर्यादीवरून नवा मोंढा पोलीस ठाण्यात पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत़ या प्रकरणी एक महिला व पुरुष अशा दोन व्यक्तींना पोलिसांनी अटक केली असून, या आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना २४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ शेतकºयांनी खते, किटकनाशके व अन्य शेती उपयोगी औषधी खरेदी करीत असताना ती अधिकृत असल्याची खात्री करूनच खरेदी करावीत़ संशयास्पद कृषी निविष्ठा आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीParbhani policeपरभणी पोलीस