जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश । मास्क न वापरणाºया १९ जणांवर कारवाईलोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी मास्कचा वापर न करणाºयांविरुद्ध दंडात्मक कारवाईचे आदेश काढले. या आदेशानंतर गंगाखेड आणि पाथरी या दोनच तालुक्यात कडक पाऊले उचलत १९ जणांविरुद्ध कारवाई केली आहे. इतर भागात आदेशाचे सर्रास उल्लंघन झाले असताना कारवाईची तीव्रता वाढली नाही.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक स्थळी थुंकणे, तोंडाला मास्क अथवा रुमाल न बांधणे, सामाजिक अंतर न राखणे, विक्रेत्यांनी मार्किंग न करणे, किराणा व जीवनाश्यक वस्तू विक्रेत्याने दरपत्रक न लावणे, सार्वजनिक ठिकाणी विनाकारण दुचाकीवरून फिरणाºया विरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी १७ एप्रिल रोजी काढले होते. त्यानंतर १८ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास गंगाखेडचे तहसीलदार स्वरूप कंकाळ यांनी परळीनाका येथे थांबून कारवाई केली.सहायक निरीक्षक विकास कोकाटे, कृषी अधिकारी टी.के. सांगळे, विस्तार अधिकारी एस.व्ही. मुंडे, दिनेश दुधाटे, जमादार दीपक भारती, अब्दुल मुजीब, पो.ना. सय्यद माजिद, अमजद पठाण, माजी सैनिक दिलीप तिडके, नगर परिषदेचे कर्मचारी जालिंदर गायकवाड, अतूल सूर्यवंशी यांची मदत घेत तोंडाला मास्क अथवा रुमाल न बांधता रस्त्याने फिरणाºया १७ जणांकडून प्रत्येकी शंभर रुपये प्रमाणे १ हजार ७०० रुपये दंड वसूल केला. तसेच पाथरी शहरातील रस्त्यांवर दुचाकीवरुन फिरणाºया एका युवकाविरुद्ध आणि बोलेरो गाडीत बसून मास्क न लावता फिरणाºया नागरिकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. पाथरी पोलीस ठाण्यात हे दोन गुन्हे दाखल झाले आहेत.१८ दुचाकी चालकांविरुद्ध गुन्हा४ संचारबंदीचे आदेश झुगारून विनाकारण फिरणाºया १८ दुचाकी चालकांविरुद्ध १७ एप्रिल रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस निरीक्षक वाय.एन. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीनिवास पडलवार, पोलीस नायक सुनील लोखंडे, वेदप्रकाश भिंगे, प्रल्हाद वाघ यांच्या पथकाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात नाकाबंदी करून ही कारवाई केली. त्यात एमएच-१४-एफआर ४८४७, एमएच-२२ एम-८५४७, एमएच- २२- एइ-०७७५, एमएच-४४ एच- ९६०२, एमएच- २२ एएफ-०४६२, एमएच- २२-एइ ६६४३, एमएच- ०६ आर- ७३९८, एमएच- २२ डब्ल्यू- ६८५५, एमएच- २२ जे- ९०१८, एमएच २२ एएस ३११०, एमएच २२ एके ६२७५ ही दुचाकी वाहने जप्त केली.४ तसेच सहायक पोलीस निरीक्षक सचिन द्रोणाचार्य, सहायक उपनिरीक्षक इनामदार, पोलीस कर्मचारी सुलक्षण शिंदे, रवी कटारे, केंद्रे, सिरसाठ यांच्या पथकाने कोद्री एमएच-२२-एएल ६२८२, एमएच- २२ एआर ९१८३, एमएच- २२ एआर २१६२, एमएच- २२ डब्ल्यू १५१२, एमएच- २२ क्यू-४६१९, एमएच-२२ एइ- २१५८ ही सहा दुचाकी वाहने जप्त केली. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास पडलवार यांच्या फिर्यादीवरुन एकूण १८ दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी एकाच दिवशी १८ दुचाकी चालकांविरुद्ध गुन्हा नोंदविल्याने नागरिकांत खळबळ उडाली आहे.पोलिसांनी जप्त केली १ हजार वाहने४परभणी: संचारबंदीचे उल्लंघन केल्या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ९९५ दुचाकी वाहने आणि ३४ चारचाकी अशी एकूण १ हजार ३१ वाहने जप्त केली आहेत. देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली असून नागरिकांना घराबाहेर पडण्यास प्रतिबंध केला आहे. मात्र नागरिकांमध्ये अद्यापही संचारबंदीचे गांभीर्य दिसून येत नाही. दररोज कारण नसताना रस्त्यावर फिरणाºयांची संख्या वाढत चालली आहे.४या नागरिकांना अटकाव करण्यासाठी पोलीस प्रशासनाने आतापर्यंत वेगवेगळे उपाय केले आहेत. तरीही नागरिकांमध्ये गांभीर्य निर्माण होत नसल्याने आता चक्क वाहने जप्त करण्याची मोहीम सुरु केली आहे. १७ एप्रिल रोजी जिल्हाभरात ७६ वाहने जप्त करण्यात आली. त्यामुळे आजपर्यंत जप्त केलेल्या वाहनांची संख्या १ हजारावर गेली आहे. याशिवाय जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाºया १०२ आरोपींविरुद्ध १७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर आजपर्यंत एकूण ६४४ नागरिकांवर असे २३६ गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांच्या या कारवाईनंतर तरी नागरिक प्रशासनाच्या नियमांचे पालन करतील, अशी आशा निर्माण केली जात आहे.
परभणी : गंगाखेड, पाथरीतच कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 12:07 AM