लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील जिल्हा रुग्णालयात जिल्ह्यासह परजिल्ह्यातील रुग्ण उपचारासाठी दररोज येतात; परंतु, गेल्या सहा महिन्यांपासून रुग्णालयात कार्यरत असलेल्या २३ सुरक्षारक्षकांना कामावरून कमी करण्यात आले आहे़ त्यातच पुरेसे सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने सध्या तरी या रुग्णालयाची सुरक्षा रामभरोसे असल्याचे दिसून येत आहे़शासकीय महाविद्यालयाविना मराठवाड्यातील सर्वात मोठे रुग्णालय म्हणून परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाची ओळख आहे़ या रुग्णालयात जिल्ह्यासह परजिल्ह्यातील दररोज किमान ५ हजार रुग्ण उपचारासाठी येतात़ या रुग्णांची उपचाराबरोबरच सुरक्षाही महत्त्वाची आहे़ ही बाब ओळखून जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने अस्थिव्यंग विभाग, स्त्री रुग्णालय, सामान्य रुग्णालय, नवजात शिशूगृह यासह इतर विभागात २३ सुरक्षारक्षकांची नेमणूक केली होती़ त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची सुरक्षा व शिस्त हे सुरक्षारक्षक प्रभावीपणे सांभाळत होते; परंतु, गेल्या सहा महिन्यांपासून या रुग्णालयातील सुरक्षारक्षक कमी करण्यात आले आहेत़ याबाबत जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने औरंगाबाद येथील आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडे याबाबत प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावामध्ये मेस्को ही कंपनी रुग्णालयात सुरक्षारक्षक पुरवत असते़ या सुरक्षारक्षकांना प्रतीमहा १८ हजार रुपये मानधन रुग्णालयाकडून देण्यात येते; परंतु, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या मानधनामध्ये वाढ झाल्याने ते मानधन आता २३ हजार रुपये प्रतीमहिन्यावर जाऊन पोहचले आहे़ परिणामी रुग्णालयाला सुरक्षा रक्षकासाठी केवळ १८ हजार रुपये येत असल्याने हे सुरक्षा रक्षक कमी करण्यात आले आहेत़ त्यामुळे रुग्णालयाची सुरक्षा लक्षात घेता यावर तोडगा काढावा, अशा आशयाचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे; परंतु, सहा महिने उलटून गेल्यानंतरही या प्रस्तावावर औरंगाबाद येथील उपसंचालक कार्यालयाकडून कोणतेही उत्तर आले नाही़ त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून रुग्णालयात एकही सुरक्षा रक्षक कार्यरत नाही़ त्यामुळे सध्या तरी रुग्णालयाची सुरक्षा रामभरोसे असल्याचेच दिसून येत आहे़सीसीटीव्ही : कॅमेरेही मिळेनातपरभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाचे कार्यक्षेत्र मोठे आहे़ त्यामुळे रुग्णालयावर नजर ठेवण्यासाठी सुरक्षारक्षकांबरोबरच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही गरज आहे़ जिल्हा रुग्णालय प्रशासनाने जिल्हा नियोजन समितीकडे जवळपास ७० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची आवश्यकता असल्याचे कळविले आहे़ हे सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हालचालीही झाल्या होत्या़ त्यानंतर सीटीव्ही कॅमेºयासाठी देण्यात येणाºया निधीचे काय झाले? हे अद्यापही समजू शकले नाही़ त्यामुळे सुरक्षारक्षकांबरोबरच पुरेसे सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने रुग्णालयाची सुरक्षा वाºयावर असल्याचे दिसून येत आहे़
परभणी: सामान्य रुग्णालयाची सुरक्षा रामभरोसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2019 11:02 PM