शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
2
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
3
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
4
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
5
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
6
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
8
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
9
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
10
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
11
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
12
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
13
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
14
लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
15
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
16
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
17
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
18
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
19
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
20
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा

परभणी : कोनेरवाडी गावाला रस्ता मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 12:20 AM

तालुक्यातील कोनेरवाडी येथील जवान शुभम मुस्तापुरे देश सेवा करताना शहीद झाला; परंतु, शहिद जवानाच्या गावाला जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे ग्रामस्थांचे आतोनात हाल होत आहेत़ ग्रामस्थांना पायपीट करून परिसरातील गावे गाठावी लागत आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी) : तालुक्यातील कोनेरवाडी येथील जवान शुभम मुस्तापुरे देश सेवा करताना शहीद झाला; परंतु, शहिद जवानाच्या गावाला जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे ग्रामस्थांचे आतोनात हाल होत आहेत़ ग्रामस्थांना पायपीट करून परिसरातील गावे गाठावी लागत आहेत़पालम तालुक्यातील कोनेरवाडी हे १०० ते १२५ घरांचे छोटेशे गाव आहे़ हे गाव मागील वर्षी देशात चर्चेत आले होते़ देशसेवा करताना या गावातील वीरपूत्र शुभम मुस्तापुरे शहीद झाले होते़ या शहीद जवानाला अखेरच्या निरोप देण्यासाठी शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी व हजारो देशप्रेमी नागरिक गावात दाखल झाले होते़ त्यानंतर या गावाचा विकास होईल, अशी आशा होती; परंतु, प्रशासनाकडून गावाच्या विकासाकडे पूर्णत: दुर्लक्ष करण्यात आले आहे़ गावाला जाण्यासाठी ६ किमीचा रस्ता असून, हा रस्ता पूर्णत: खराब झालेला आहे़ पावसाळ्यात तर चिखल तुडवित ग्रामस्थांना हा रस्ता पार करावा लागतो़ रस्त्याअभावी गेल्या वर्षी एका महिलेचा मृत्यूही झाला होता़ग्रामस्थांनी वारंवार मागणी करूनही रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष केले जात आहे़ त्यामुळे तातडीने हा रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांच्याकडे केली आहे़ यावेळी सरपंच सरूबाई मुस्तापुरे, उपसरपंच मीरा राठोड, भागवत मुस्तापुरे, हनुमान मुस्तापुरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते़

टॅग्स :parabhaniपरभणीcollectorजिल्हाधिकारी