लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : उच्चदाब प्रणाली योजनेंतर्गत जवळपास ५ हजार ५०० शेतकऱ्यांना स्वतंत्र विद्युत रोहित्र उभारण्यासाठी वीज वितरण कंपनीने ३१ डिसेंबरपर्यंत २०१९ पर्यंत मुदत दिली होती; परंतु, या मुदतीत केवळ १ हजार ६०० विद्युत रोहित्रांची उभारणी झाली़ त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केल्यानंतर नांदेड येथील मुख्य अभियंता दत्तात्रय पडाळकर यांनी १४ जानेवारी रोजी बैठक घेऊन १५ फेब्रुवारीपर्यंत ३ हजार विद्युत रोहित्रे बसविण्याचे कंत्राटदारांना उद्दिष्ट दिले आहे़शेतकºयांना उपलब्ध पाण्याचा शेती सिंचनासाठी उपयोग व्हावा, यासाठी वीज वितरण कंपनीने उच्चदाब प्रणाली योजना अंमलात आणली़ या अंतर्गत ८६ कोटी रुपयेही मंजूर केले़ या रकमेतून १५ सप्टेंबर २०१८ रोजी संबंधित गुत्तेदारांना कार्यारंभ आदेशही दिले़ त्यामुळे या योजनेतून ५ हजार ५०० लाभार्थी शेतकºयांना स्वतंत्र विद्युत रोहित्र मिळून वीज समस्यांतून सुटका मिळेल, अशी अपेक्षा होती़ योजनेतील कामे पूर्ण करण्यासाठी ३१ डिसेंबर २०१९ ही मुदत दिली होती. त्यामुळे या मुदतीत पूर्ण कामे होतील, अशी आशा बाळगून असलेल्या लाभार्थ्यांचा मात्र भ्रमनिरास झाला आहे़ विशेष म्हणजे, या योजनेत जवळपास १३ कंत्राटदार असून, उपकंत्राटदारांचाच भरणा झाला आहे़ त्यामुळे इतर योजनांप्रमाणेच या योजनेचाही बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे़ विशेष म्हणजे, मुदत संपून दीड महिन्यांचा कालावधी उलटूनही सद्यस्थितीत केवळ १७०० विद्युत रोहित्रे उभारणीचे काम पूर्ण झाले आहे़ ३ हजार ३०० विद्युत रोहित्रे उभारणीचे काम अद्यापही बाकी आहे़ त्यामुळे पाणी उपलब्ध असूनही रबी हंगामातील पिकांना सिंचन करताना शेतकºयांना अडचणींचा सामना करावा लागत आहे़ या योजनेतील कामे वेळेत पूर्ण झाली असती तर सुरळीत वीजपुरवठा होवून शेतकºयांना योजनेचा लाभ झाला असता; परंतु, कंत्राटदारांच्या उदासीन भूमिकेमुळे व अधीक्षक अभियंता कार्यालयाच्या दुर्लक्षामुळेच या योजनेतील कामे अपूर्ण आहेत़या कामांचा आढावा घेण्यासाठी १४ जानेवारी रोजी नांदेड येथील मुख्य अधीक्षक अभियंता दत्तात्रय पाडळकर यांच्या उपस्थितीत कंत्राटदारांची बैठक परभणीत झाली़ १५ फेब्रुवारीपर्यंत उर्वरित कामे पूर्ण करण्याचे आदेश पाडळकर यांनी कंत्राटदारांना दिले आहेत. कामे पूर्ण झाली नाही तर संबंधित कंत्राटदारांना बडतर्फ करून काळ्या यादीत टाकण्याचाही इशारा पाडळकर यांनी दिला आहे़ त्यामुळे ३ हजार विद्युत रोहित्र उभारताना कंत्राटदारांचे कसब पणाला लागणार आहे.उदासिन कंत्राटदारांवर कारवाई करा: लाभार्थ्यांची मागणी४वीज वितरण कंपनीकडून आतापर्यंत दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना, इन्फ्रा, इन्फ्रा-२ आदी योजनांची कामे दिलेल्या मुदतीत कंत्राटदारांकडून पूर्ण करण्यात आली नाहीत़ त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होवूनही कंत्राटदारांच्या उदासीन भूमिकेमुळे वीज वितरण कंपनी व लाभार्थी शेतकºयांचा लाभ झाला नाही़४विशेष म्हणजे, काही कंत्राटदारांनी इन्फ्रा-२ सारख्या योजनेत १५-१५ कोटी रुपयांची कामे अर्धवट सोडून पोबारा केला होता़ त्यानंतर वीज वितरण कंपनीला दुसºयांदा निविदा काढून ती कामे पूर्ण करून घ्यावी लागली़ असे असतानाही त्याच कंत्राटदारांना वीज वितरण कंपनी व राज्य शासनाच्या महत्त्वकांक्षी असलेल्या उच्चदाब प्रणाली योजनेंतर्गत कामे दिली आहेत़ तसेच उपकंत्राटदारांचाही मोठ्या प्रमाणात भरणा झाला आहे़ योजनेतील कामे मुदतीत पूर्ण झालेली नाहीत़ त्यामुळे मुदतीत कामे पूर्ण न करणाºया कंत्राटदारांवर कारवाई होणे गरजेचे असल्याची भावना लाभार्थी शेतकºयांतून व्यक्त होत आहे़
परभणी : १५ दिवसांत ३ हजार रोहित्रे बसविण्याचे उद्दिष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2020 12:47 AM