लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी): तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रातील डिग्रस बंधाऱ्याचे पाणी सोडल्याने गोदावरीच्या पात्रात कमी पाणी होते़ आता मागील महिनाभरात पाणी संपले असून, अनेक ठिकाणी गोदावरीचे पात्र कोरडेठाक पडले आहे़ त्यामुळे गोदाकाठच्या गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू झाली आहे़डिग्रस बंधाऱ्यात यावर्षी मुबलक पाणीसाठा होता; परंतु, डिसेंबर महिन्यातच नांदेडसाठी पाणी सोडण्यात आल्याने बंधाºयात केवळ ५ दलघमी एवढाच पाणीसाठा शिल्लक होता़ गोदावरी नदी पात्रातील मोठमोठे खड्डे गाळाने भरले आहेत़ यामुळे पात्राची साठवण क्षमता कमी झाली आहे़ दिवसेंदिवस खड्ड्यातील पाणी आटत आहे़ याचा फटका गोदाकाठच्या शेतकऱ्यांना बसत असून, बागायती पिके वाळून जात आहेत़ पाणी साठे संपत आल्याने जागोजाग पात्र कोरडे पडले आहे़ सोमेश्वर, घोडा, आरखेड, उमरथडी, धनेवाडी, खुर्लेवाडी, रावराजुर, सांवगी भु या गावांच्या शेजारी गोदावरीचे पात्र पूर्णत: कोरडे पडले आहे़ तसेच पूर्णा तालुक्यातील गोळेगाव, देऊळगाव, वजुर, देवठाणा या गावांतही पात्रातून प्रवासी वाहतूक सुरू झालेली आहे़ मात्र गोदावरीचे पात्र कोरडे पडल्याने १२ गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे़ बंधाºयातील पाणी लवकर सोडल्याने पूर्ण, पालम तालुक्यातील गावांवर टंचाईचे संकट ओढावले आहे़ प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा फटका या गावांना बसण्यास सुरू झाली आहे़ऊस पीक : मोडण्याची आली वेळगोदाकाठच्या गावात दोन्ही बाजूनी दिग्रस बंधारा असल्याने यावर्षी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड झालेली होती़; परंतु, पाणी नांदेडसाठी सोडल्याने पात्रात साठा शिल्लक राहिलेला नाही़ याचा सर्वाधिक फटका बागायती पिकांना बसणार आहे़ हजारो रुपयांचा केलेला खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली असून, उसाच्या पिकावर नागर फिरविण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे़ग्रामपंचायतींपुढे निर्माण झाल्या अडचणीगोदावरी पात्रात गावांना पाणीपुरवठा करणाºया सार्वजनिक विहिरींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे़ पात्रात पाणी असेल तर योजनेच्या विहिरींना भरपूर पाणी राहते़ पण यावर्षी पाणी सोडून देण्यात आल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे़ त्यामुळे ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी कसे उपलब्ध करून द्यावे, हा प्रश्न ग्रामपंचायतींपुढे निर्माण झाला आहे
परभणी: गोदावरीचे पात्र पडले कोरडेठाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 12:33 AM