लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : धुळे जिल्ह्यातील गोंदूर येथील ग्रामसेवक एस़बी़ वाघ यांच्या आत्महत्येची सीआयडी चौकशी करून आत्महत्येस जबाबदार असणाºया आरोपींवर तात्काळ कारवाई करावी, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने २४ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ग्रामसेवक एस़बी़ वाघ यांनी गोंदूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात आत्महत्या केली आहे़ या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या आरोपींवर अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आली नाही़ त्यामुळे या आरोपींची सीआयडी चौकशी करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने जिल्हा परिषदेपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी दुपारी साडेबाराच्याच्या सुमारास मूक मोर्चा काढण्यात आला़त्यानंतर जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले़ निवेदनावर आऱटी़ राठोड, अशोक भोसले, डी़एम़ कदम, पी़बी़ काळे, व्ही़ के़ कांगणे, एम़डब्ल्यू़ पांचाळ, एस़व्ही़ गडलवाड, एस़एम़ चेन्नेवार, दीपक सातपुते यांच्यासह ग्रामसेवक युनियनच्या पदाधिकाºयांची नावे आहेत़
परभणी ग्रामसेवक युनियनचा जिल्हा कचेरीवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 12:18 AM