लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी): जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने तालुक्यातील तळतुंबा येथील सरपंचासह एका सदस्याचे सदस्यत्व अपात्र ठरविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी घेतला आहे़तालुक्यातील तळतुंबा येथे कल्पना उर्फ मणकर्णा गणेश घुले या नागरिकांचा मागासप्रवर्गातून विजयी झाल्या होत्या़ तसेच नागरिकांच्या मागासप्रवर्ग महिला या राखीव जागेवरून त्या सरपंच झाल्या होत्या़ त्याचप्रमाणे गीता सुभाष प्रधान या अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून निवडून आल्या होत्या़ ग्रामपंचायत अधिनियमानुसार निवडून आल्यानंतर सहा महिन्यांत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे़ मात्र मुदत संपूनही दोन्ही सदस्यांनी हे प्रमाणपत्र सादर केले नसल्याने हरिभाऊ धोंडीबा घुगे यांनी आक्षेप दाखल केला होता़ त्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या न्यायालयात सुनावणी झाली़ सुनावणी अंती ग्रामपंचायत अधिनियमान्वये कल्पना घुगे व गीता प्रधान यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व अपात्र ठरविण्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी दिला़ या प्रकरणी अर्जदाराकडून अॅड़ डी़ आऱ दळवे यांनी काम पाहिले़
परभणी : सरपंचासह ग्रा़पं़ सदस्य सदस्यत्व अपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2019 1:07 AM