शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

परभणी :दु:ख माणसाला संकटाला सामोरे जाण्याचे बळ देतात- समाधान महाराज शर्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 1:00 AM

जीवनात सुख आणि दु:खाचे चक्र सुरूच असते. दु:ख झाल्यानंतर येणारे सुख मनाला आनंद देऊन जाते. त्याच बरोबर दु:खातून माणसाला जगण्याचे बळ प्राप्त होते, असे प्रतिपादन ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपोखर्णी (नृसिंह) (जि. परभणी): जीवनात सुख आणि दु:खाचे चक्र सुरूच असते. दु:ख झाल्यानंतर येणारे सुख मनाला आनंद देऊन जाते. त्याच बरोबर दु:खातून माणसाला जगण्याचे बळ प्राप्त होते, असे प्रतिपादन ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांनी केले.श्रीक्षेत्र पोखर्णी नृसिंह येथे नृसिंह जन्मोत्सवानिमित्त आयोजित नृसिंह पुराण कथेप्रसंगी समाधान महाराज शर्मा बोलत होते.ते म्हणाले, मार्कण्डेय ऋषीची आई असो वा आपली आई जगामध्ये आईपेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही. ती स्वत: कितीही दु:ख सहन करील, मात्र आपल्या लेकराला सुख देण्यासाठी ती नेहमीच प्रयत्नशील असते. त्यामुळे आई सारखे दु:ख झेलणारे कोणीही नाही, असे त्यांनी सांगितले. आजच्या घडीला मानवाचे विकृतीकरण होत आहे. मानव दानव होण्याच्या मार्गावर असून ही मानवाची हार आहे. मानवाची ही विकृती थांबायला पाहिजे, असे महाराज म्हणाले. या कथेप्रसंगी यम, यमी आणि मार्कण्डेय यांचा सजीव देखावा सादर करण्यात आला. कथेचे संगीत संयोजन संतोष शर्मा यांनी केले.या कथेसाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. नृसिंह पुराण कथा झाल्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोखर्णी येथील ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत. भाविकांसाठी पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.नृसिंह पुराण कथेने भाविक मंत्रमुग्ध४श्री नृसिंह पुराण कथेमध्ये विविध अवतारांचे वर्णन करताना ह.भ.प. समाधान महाराज शर्मा हे ओघवत्या शैलीत कथा निरूपण करीत आहेत. कथाश्रवणाने भाविक मंत्रमुग्ध होत आहेत. संगीत सहाय्यक कथेच्या प्रसंगानुरूप संगीत देत असल्याने कथा अधिक प्रभावी होत आहे. अध्यात्म आणि विज्ञान याची सांगड घालत कथा निरुपण केले जात आहे.४ याप्रसंगी सिंथेसायझरवर संतोष शर्मा, बासरी समाधान महाराज चोपडे, पखवाज सिद्धेश्वर महाराज निळे, ढोलक व पैड शुभम देवाडकर, तबला शिवाजी आरदड, संगीतसाथ गोविंद महाराज नाईकवाडे हे साथसंगत करीत आहेत. किर्तीशकुमार वैष्णव यांनी देखावा साकारला. भिकूलाल पुनपालिया व अलका पुनपालिया हे कथेचे यजमान आहेत.४ १६ मे रोजी ह.भ.प. उद्धव महाराज ठोंबरे दिंद्रुडकर यांचे रात्री ९ वाजता कीर्तन होणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीReligious programmeधार्मिक कार्यक्रम