लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : निराधार योजना व दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मासिक अनुदानात राज्य शासनाने वाढ केली असून, या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांच्या कौटुंबिक उत्पन्न मर्यादेतही वाढ केली आहे़ त्यामुळे निराधार, दिव्यांगांना दिवाळीची एक प्रकारे राज्य शासनाने भेट दिली आहे़संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेंतर्गत लाभार्थ्यांना मिळणाºया अनुदानात वाढ करण्याची मागणी लोकप्रतिनिधी, विविध अपंग संघटना व स्वयंसेवी संस्थांच्या वतीने करण्यात आली होती़ संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेंतर्गत ४० ते ७९ टक्के दिव्यांगता असलेल्या दिव्यांगांना देण्यात येणारे अनुदान दरमहा ८०० रुपये तर ८० टक्क्यांहून अधिक दिव्यांगता असलेल्या दिव्यांगांना प्रतिमहा १ हजार रुपये निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय राज्य शासनाने काही महिन्यांपूर्वी जाहीर केला होता़ त्यानुसार अनुदानात वाढ करण्यात आली आहे़आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत ४० ते ७९ टक्के दिव्यांगता असणाºया लाभार्थ्यांना आता ६०० ऐवजी ८०० रुपये तर ८० टक्के व त्याहून अधिक दिव्यांगता असलेल्या लाभार्थ्यांना ८०० रुपये ऐवजी १ हजार रुपये अनुदान मिळणार आहे़ श्रावणबळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेंतर्गत ४० ते ७९ टक्के दिव्यांगत्व प्रमाणपत्र असलेल्या लाभार्थ्यांना ६०० रुपयांऐवजी ८०० रुपयांचे तर ८० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या लाभार्थ्यांना ८०० ऐवजी १ हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे़ इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेंतर्गत ४० ते ७९ टक्के अपंगत्व असलेल्या पात्र लाभार्थ्यांना आता दरमहा ६०० रुपयांऐवजी ८०० रुपये अनुदान मिळणार आहे़ ८० टक्क्याहून अधिक दिव्यांगत्व असलेल्या लाभार्थ्यांनाही आता ८०० ऐवजी १ हजार रुपये अनुदान मिळणार आहे़ या संदर्भातील आदेश ३ नोव्हेंबर रोजी राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने काढले आहेत़ दिवाळीचा सण सोमवारपासून सुरू झाला असून, शनिवारीच या संदर्भातील आदेश निघाल्याने दिव्यांग व निराधार लाभार्थ्यांना एक प्रकारे राज्य शासनाची ही भेट मानल जात आहे़ शासनाचा हा निर्णय ९ आॅक्टोबर २०१८ पासून अंमलात येणार आहे़ त्यामुळे गेल्या महिन्याचेही अनुदान नव्याच नियमानुसार देण्यात येणार आहे़वार्षिक उत्पन्न : मर्यादेत वाढराज्य शासनाने दिव्यांग लाभार्थ्यांसाठी सुरू केलेल्या या राज्य पुरस्कृत विशेष सहाय्य योजनेकरीता कौटुंबिक उत्पन्न मर्यादेतही वाढ केली आहे़ यापूर्वी संबंधित लाभार्थ्यांना लाभ मिळविण्यासाठी वार्षिक २१ हजार रुपये उत्पन्न असणे आवश्यक होते. आता ही उत्पन्न मर्यादा ५० हजार रुपये करण्यात आली आहे़ निराधार व दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणाºया अनुदानाची तरतूद सर्वसाधारण अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी करण्यात आलेल्या विशेष सहाय्य योजनेच्या तरतुदीमधून केली जाणार आहे़, असेही या संदर्भातील आदेशात राज्य शासनाने नमूद केले आहे़
परभणी : निराधारांच्या अनुदानात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2018 12:25 AM