लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शासनाने गंभीर स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केलेल्या तालुक्यांना बुधवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भेटी देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली़ या पाहणी दरम्यान अधिकाऱ्यांना तातडीच्या उपाययोजना संदर्भात त्यांनी सूचना केल्या़बुधवारी सकाळी परभणी येथील आढावा बैठक आटोपल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथे दाखल झाले़ येथे त्यांनी भागवत रंगनाथराव पानपते यांच्या शेतातील कापूस पिकाची पाहणी केली़ पेरणीसाठी झालेला खर्च आणि उत्पन्न यातील तफावतीबाबत शेतकºयांनी पालकमंत्र्यांना माहिती दिली़ यावेळी खा़ बंडू जाधव, आ़ मोहन फड, विशाल कदम, तालुकाप्रमुख मुंजाभाऊ कोल्हे, उपविभागीय अधिकारी कोळी आदींची उपस्थिती होती़मानवत तालुक्यातील ताडबोरगाव, कोल्हा आदी ठिकाणी प्रत्यक्ष शेतावर जावून गुलाबराव पाटील यांनी शेतकºयांशी संवाद साधला़ यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेश ढगे, जि़प़ सदस्य विष्णू मांडे, सभापती बंडू मुळे, सरपंच पठाडे आदींची उपस्थिती होती़पाऊस झाला नसल्याने सोयाबीन काढणीचा खर्चही निघाला नाही़ रबीच्या आशा मावळल्या आहेत, असे शेतकºयांनी सांगितले़ यावर शेतकºयांना मदतीसाठी लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन गुलाबराव पाटील यांनी दिले़बंधाºयाची पाहणीपालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सेलू तालुक्यातील मोरेगाव येथील कोल्हापुरी बंधाºयाची पाहणी केली़ या बंधाºयावर लोखंडी कठड्यांऐवजी लोकसहभागातून सिमेंटचे कठडे उभारण्याच्या सूचना त्यांनी शिवसेना पदाधिकारी व शेतकºयांना दिल्या़ यावेळी जि़प़ गटनेते राम पाटील, रमेश डख, काशीनाथ घुमरे, मनिष कदम, अतुल डख, बाबा भाबट, शत्रुघ्न मगर आदी उपस्थित होते़ या पाहणीच्या वेळी दबाव गटाच्या वतीने पालकमंत्र्यांची भेट घेण्यात आली़ निम्न दूधना प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी दबाव गटाने केली होती़ त्यावर जिल्हाधिकाºयांसोबत बैठक घेऊन पिकांसाठी दोन पाणी पाळ्या सोडण्याबाबत चर्चा झाली आहे़, असे त्यांनी यावेळी सांगितले़सोनपेठमध्ये पाहणीगुलाबराव पाटील यांनी सोनपेठ येथे आढावा बैठक घेतली़ त्यानंतर तालुक्यातील दुधगाव व वाणी संगम शिवारातील कापूस पिकाची पाहणी केली़ सुरेश ढगे, विष्णू मांडे, तहसीलदार जीवराज डापकर, गणेश कोरेवाड, बाळासाहेब बायस, मधुकर निरपणे, रमाकांत जहागीरदार, दिगांबर भाडुळे, रंगनाथ सोळंके आदींसह अधिकारी, शेतकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते़
परभणी : दुष्काळग्रस्त तालुक्यांची पालकमंत्र्याकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 12:40 AM