शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

परभणी : २५४१ लोकप्रतिनिधींवर कारवाईची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2018 12:46 AM

मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागेवर निवडून आलेल्या; परंतु, शासनाने ठरवून दिलेल्या विहित मुदतीत जात पडताळणी प्रमाणत्र सादर न करणाऱ्या मराठवाड्यातील २ हजार ५४१ लोकप्रतिनिधींवर सदस्यत्व रद्द होण्याची टांगती तलवार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागेवर निवडून आलेल्या; परंतु, शासनाने ठरवून दिलेल्या विहित मुदतीत जात पडताळणी प्रमाणत्र सादर न करणाऱ्या मराठवाड्यातील २ हजार ५४१ लोकप्रतिनिधींवर सदस्यत्व रद्द होण्याची टांगती तलवार आहे.राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या; परंतु, सहा महिन्यांच्या आत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणाºया लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व संपुष्टात आणण्याच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता. या निर्णयामुळे सर्वत्र खळबळ उडाली. या अनुषंगाने राज्याच्या ग्रामविकास विभागाचे उपसचिव संजय बनकर यांनी २९ आॅगस्ट रोजी सर्व जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना या संदर्भात माहिती मागविली होती. त्यानुसार मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांची माहिती राज्य सरकारकडे सादर करण्यात आली आहे. त्यानुसार मराठवाड्यातील जिल्हा परिषदेतून २८, पंचायत समित्यांमधून ५४ व ग्रामपंचायतीमधून ३ हजार ३६९ असे एकूण ३ हजार ४५१ उमेदवार राखीव प्रवर्गातून निवडून आले होते. त्यापैकी नामनिर्देशनपत्रासोबत जि.प.च्या १३, पं.स.च्या २३ व ग्रा.पं.३६० अशा ३९६ उमेदवारांनी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले होते. निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या कालावधीत जि.प.च्या ८, पं.स.च्या १६ व ग्रा.पं.च्या ४९० अशा ५१४ सदस्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले होते. सहा महिन्यांचा कालावधी लोटला तरी जात पडताळणी प्रमाणपत्र जि.प.च्या ७, पं.स.च्या १५ व ग्रा.पं.च्या २ हजार ५१९ अशा एकूण २ हजार ५४१ सदस्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र सादरच केले नाही. त्यामुळे या २ हजार ५४१ सदस्यांचे सदस्यत्व संपुष्टात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने न्यायालयाच्या निर्णयानुसार निर्णय घेतला तर या सर्व जागांवर नव्याने निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळे जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणाºया लोकप्रतिनिधींमध्ये खळबळ उडाली आहे.जिल्ह्यातील १३४४ ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व धोक्यातजिल्ह्यातील पूर्णा तालुका वगळता ८ तालुक्यांमधील १ हजार ५१० ग्रा.पं. सदस्यांपैकी १ हजार ३४४ सदस्यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र ६ महिन्यांचा कालावधी लोटला तरी सादर करण्यात आले नसल्याने त्यांचे सदस्यत्व धोक्यात आले आहे. यामध्ये पाथरी तालुक्यातील १८० सदस्य राखीव प्रवर्गातून निवडून आले होते. त्यापैकी १६ सदस्यांनी वेळेत प्रमाणपत्र सादर केले. तर १६४ सदस्यांनी ६ महिन्यांचा कालावधी लोटला तरी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नाही. परभणी तालुक्यातील १२७ सदस्य राखीव प्रवर्गातून निवडून आले. २२ सदस्यांनी वेळेत प्रमाणपत्र सादर केले.१०३ सदस्यांनी वेळेत प्रमाणपत्र सादर केलेले नाही. गंगाखेड तालुक्यातील १६४ सदस्य राखीव प्रवर्गातून निवडून आले. त्यापैकी ३९ सदस्यांनी वेळेत प्रमाणपत्र सादर केले. १०३ सदस्यांनी मात्र वेळेत प्रमाणपत्र सादर केले नाही. मानवत तालुक्यातील २८ सदस्य राखीव प्रवर्गातून निवडून आले. त्यापैकी ३ सदस्यांनी वेळेत प्रमाणपत्र दाखल केले. २५ सदस्यांनी वेळेत प्रमाणपत्र दाखल केले नाही. पालम तालुक्यातील ५३० सदस्य राखीव प्रवर्गातून निवडून आले. त्यापैकी ४६ सदस्यांनी वेळेत प्रमाणपत्र सादर केले.४८४ सदस्यांनी मात्र वेळेत प्रमाणपत्र सादर केले नाही. सोनपेठ तालुक्यातील २५१ सदस्य राखीव प्रवर्गातून निवडून आले. त्यापैकी ३० सदस्यांनी वेळेत प्रमाणपत्र सादर केले. २२१ सदस्यांनी मात्र वेळेत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नाही. जिंतूर तालुक्यातील १३० सदस्य राखीव प्रवर्गातून निवडून आले. त्यापैकी ८ सदस्यांनी वेळेत प्रमाणपत्र सादर केले. १२२ सदस्यांनी मात्र वेळेत प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व धोक्यात आले आहे.सर्वाधिक सदस्य पालम तालुक्यातजिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यात नऊही तहसीलदारांकडून याबाबत माहिती मागविली होती. त्यापैकी फक्त पूर्णा तहसीलदारांनी गेल्या ८ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाला माहिती दिलेली नाही. उर्वरित ८ तालुक्यांपैकी पालम तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ४८४ सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. या व्यतिरिक्त पाथरी तालुक्यातील १६४, परभणी तालुक्यातील १०३, गंगाखेड तालुक्यातील २२५, मानवत तालुक्यातील २५, सेलू तालुक्यातील २२१ व जिंतूर तालुक्यातील १२२ सदस्यांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीCaste certificateजात प्रमाणपत्रcollectorजिल्हाधिकारीElectionनिवडणूकzpजिल्हा परिषद