लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : सीएए आणि एनआरसी कायदा रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी बहुजन मुक्ती मोर्चाने पुकारलेल्या भारत बंदला परभणी, पाथरी शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील बाजारपेठ दिवसभर कडकडीत बंद ठेवण्यात आली. गंगाखेड, जिंतूर, सेलू या तालुक्यांमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला तर मानवत, पूर्णा, सोनपेठ, पालम तालुक्यात दिवसभर व्यवहार सुरळीत राहिले.सीएए आणि एनआरसी कायद्याच्या विरोधात बुधवारी भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार परभणी शहरातील मुख्य बाजारपेठेसह विविध भागातील दुकाने सकाळपासूनच बंद होती. येथील जनता मार्केट, शिवाजी चौक, सुभाष रोड, स्टेशन रोड, बसस्थानक परिसर, जिंतूर रोड, डॉक्टर लेन, जिल्हा रुग्णालय परिसर या भागातील दुकाने बंद होती. शहरातील काही शाळानींही बंदमध्ये सहभाग नोंदविला. त्यामुळे या बंदला परभणीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दुपारच्या सुमारास युवकांनी शहरातील बाजारपेठ भागात फिरुन बंदचे आवाहन केले. त्यास व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला. बंदच्या काळात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. सेलू शहरातही बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. आठवडी बाजारातील दुकाने बंद होती. मात्र शहरातील इतर ठिकाणची दुकाने सुरु होती. दुपारी २ वाजेनंतर व्यवहार सुरळीत झाले. मुख्य बाजारपेठेवर बंदचा परिणाम दिसून आला नाही.पाथरीत कडकडीत बंदभारत बंदला पाथरी शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बाजारपेठेतील सर्व दुकाने दिवसभर कडकडीत बंद ठेवण्यात आली. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला.पूर्णा, सोनपेठ, मानवत, पालम आणि जिंतूर या तालुक्यात बंदला प्रतिसाद मिळाला नाही. येथील बाजारपेठेतील व्यवहार सुरळीत सुरु राहिले. जिंतुरातील काही भागातील दुकाने बंद होती. बोरी येथे काही दुकाने बंद ठेवण्यात आली होती. पाथरी तालुक्यातील लिंबा येथे व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून बंदला प्रतिसाद दिला. एरव्ही कोणत्याही बंदचा गावात प्रभाव पडत नाही; परंतु, बुधवारी पहिल्यांदाच गावातील सर्व व्यापाºयांनी बंदमध्ये सहभाग नोंदविला.गंगाखेडमध्ये संमिश्र प्रतिसादगंगाखेड शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. बाजारपेठेतील काही दुकाने वगळता व्यवहार सुरळीत होते. मुख्य बाजारपेठेतील काही दुकाने बंद ठेवण्यात आली. शाईनबागच्या धर्तीवर तहसील कार्यालयासमोर सुरु असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनात व्यापाºयांनी सहभाग नोंदविला. तसेच शहरातील काही व्यापाºयांनी बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचा निर्णय घेतला. तसे व्यापारी महासंघाच्या वतीने पोलीस निरीक्षक वाय.एन.शेख यांना निवेदन देऊन दुकाने चालू ठेवली.
परभणीत कडकडीत; ग्रामीणमध्ये संमिश्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 12:52 AM