लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड/सोनपेठ (परभणी): जिल्ह्यातील गंगाखेड आणि सोनपेठ या दोन तालुक्यांत शनिवारी सायंकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावली आहे़ गंगाखेड शहरात जोरदार पाऊस झाल्याने अनेक भागांत पाणी साचले होते़जिल्ह्यात अद्याप मान्सून दाखल झाला नसला तरी पूर्व मोसमी पाऊस होत आहे़ दररोज सायंकाळच्या सुमारास वातावरणात बदल होत असून, सोसाट्याचे वारे वाहतात़ शनिवारी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यात वातावरणामध्ये बदल झाला़गंगाखेड आणि परिसरात सायंकाळी साडेपाच वाजेपासून पावसाला सुरुवात झाली़ ५़४० ते ६़२० असा ४० मिनिटे जोरदार पाऊस झाला़ तालुक्यातील दुसलगाव, अंबरवाडी, खळी, महातपुरी या भागातही रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे़ गंगाखेड रेल्वेस्थानक परिसरात पावसाचे पाणी साचल्याने प्रवाशांना कसतर करावी लागली़तसेच सोनपेठ शहर व परिसरात शनिवारी सायंकाळी ६़१५ च्या सुमारास मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला़ पूर्णा, पालम तालुक्यांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण होते़ मात्र पावसाने हजेरी लावली नाही़ परभणी शहरातही सायंकाळच्या सुमारास सोसाट्याचे वारे वाहू लागले; परंतु, पाऊस झाला नाही़
परभणी : गंगाखेडमध्ये जोरदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 12:22 AM