लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील १४ गावांमध्ये एलईडी पथदिवे, हायमास्ट व सौर पथदिवे बसविण्यासाठी तब्बल १ कोटी १० लाख ८५ हजार २९७ रुपये खर्च करण्यात येणार असून, यासाठीच्या निविदा १४ नोव्हेंबर रोजी बांधकाम विभागाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आल्या़ विशेष म्हणजे जिल्ह्यात आतापर्यंत जि़प़ने बसविलेले अनेक ठिकाणचे हायमास्ट व सौर पथदिवे बंद पडले आहेत़ त्याचा मात्र आढावा घेण्यात आलेला नाही़जिल्हा परिषदेच्या वतीने २०१९-२० या आर्थिक वर्षांत पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केलेल्या सुचनेनुसार जिल्ह्यातील १४ गावांमध्ये एलईडी पथदिवे, हायमास्ट व सौर पथदिवे बसविण्याच्या अनुषंगाने बांधकाम विभागाच्या वतीने १४ नोव्हेंबर रोजी निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या़ त्यामध्ये परभणी तालुक्यातील जांब येथे एलईडी पथदिवे बसविण्यासाठी ६ लाख ६ हजार १३२ रुपये खर्च करण्यात येणार असून, पान्हेरा येथे सौर पथदिवे बसविण्यासाठी ७ लाख ८५ हजार ९७५ तर टाकळी कुंभकर्ण येथे सौर पथदिवे बसविण्यासाठी ७ लाख ८२ हजार ६९ रुपये, कौडगाव येथे सौर पथदिव्यांसाठी ८ लाख ३ हजार २२९ रुपये खर्च करण्यात येणार आहेत़ असोला येथे १७ लाख ६७ हजार १०४ रुपये खर्च करण्यात येणार आहेत़पिंप्री देऊळगाव येथील पथदिव्यांसाठी ६ लाख २ हजार ४२२ रुपये खर्च करण्यात येणार आहेत़ मानवत तालुक्यातील केकरजवळा येथे हायमास्ट बसविण्यासाठी ४ लाख ४१ हजार ७५१ रुपये तर कोल्हा येथील सौर पथदिव्यांसाठी १२ लाख ३७ हजार ६६३ रुपये, नागरजवळा येथील सौर पथदिव्यांसाठी ८ लाख ८३ हजार ५४२ रुपये खर्च करण्यात येणार आहेत़ या शिवाय पालम तालुक्यातील गुळखंड येथे सौर पथदिव्यांसाठी ६ लाख १९ हजार ६६९ रुपये, वाडी खुर्द येथील सौर पथदिव्यांसाठीही ६ लाख १९ हजार ६६९ रुपये खर्च करण्यात येणार आहेत़ पूर्णा तालुक्यातील इठलापूर येथील पथदिव्यांसाठी ८ लाख ८२ हजार ३३८ रुपये, पिंपळगाव ठोंबरे येथील सोलार हायमास्टसाठी ७ लाख ८२ हजार ५४३ रुपये खर्च करण्यात येणार आहेत़ सोनपेठ प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गतच्या कामासाठी ८ लाख ८४ हजार ८६३ रुपये खर्च करण्यात येणार आहेत़ या कामांच्या निविदा १४ नोव्हेंबर रोजी काढण्यात आल्या असून त्या २८ नोव्हेंबर रोजी उघडण्यात येणार आहेत़ सदरील निविदा राज्य शासनाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत़ सदरील सौर पथदिवे, हायमास्ट बसविण्याचे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण करावयाचे असून, त्यामध्ये बिघाड झाल्यास २४ महिन्यांच्या कालावधीत तो दुरुस्त करून देण्याची अट घालण्यात आली आहे.अधिक दरांमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी काम केले होते बंद४स्थानिक विकास निधीतून अनेक लोकप्रतिनिधींनी दोन वर्षापूर्वी रस्ते, पाणी, स्मशानभूमी सुशोभिकरण आदी मुलभूत कामांऐवजी एलईडी पथदिवे बसविण्याची कामे प्रस्तावित केली होती़ त्यावेळी असलेला यासाठीचा शासकीय दर आणि प्रत्यक्षात बाजारातील वस्तुंची किंमत यामध्ये प्रचंड तफावत होती़ उदा़ जे पथदिवे बाजारात ११ हजार रुपयांना मिळत होते़४त्याची शासकीय दरसूचित २५ हजार रुपये किंमत होती़ ही बाब जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी एलईडी पथदिव्यांची कामे मंजूर न करण्याचा निर्णय घेतला होता़ नंतरच्या काळात शासकीय किंमतीमध्ये बदल झाले़ त्यानंतर संबंधित कामे पूर्ववत झाली़४जिल्हा परिषदेच्या वतीनेही आतापर्यंत अनेक गावांमध्ये एलईडी पथदिवे बसविण्यात आले आहेत़ त्याचा दर्जा आणि प्रत्यक्षात बाजारातील किंमत व शासकीय दर यामध्ये मोठी तफावत येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली़ त्यामुळे जि़प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी या बाबीची दखल घेवून या कामासंदर्भात काय निर्णय घेतात? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे़ग्रामीण भागातील अनेक ठिकाणचे पथदिवे पडले बंद४परभणी तालुक्यातील झरी येथे दोन वर्षापूर्वी एलईडी पथदिवे बसविण्यात आले होते़ त्यातील काही पथदिवे सद्यस्थितीत बंद पडले आहेत़ बोरी, चारठाणा येथील काही पथदिव्यांचीही अशीच अवस्था आहे़४गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथे एलईडी पथदिवे काही दिवसांपूर्वी बसविण्यात आले होते़ तेही आता बंद पडले आहेत़४प्रातिनिधीक स्वरुपात काही मोठ्या गावांची ही स्थिती आहे़ इतर लहान गावांमध्येही एलईडी पथदिव्यांची दयनिय स्थिती आहे़
परभणी : हायमास्ट, सौर दिव्यांवर सव्वा कोटी खर्च होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 12:09 AM