लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात बुधवारी काँग्रेसकडून माजी आ़ सुरेश देशमुख यांनी तर शिवसेनेकडून विप्लव गोपीकिशन बाजोरिया यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले़परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा ३ मे हा शेवटचा दिवस आहे़ २ मे पर्यंत एकाही उमेदवाराने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला नव्हता़ २ मे रोजी सकाळी शिवसेनेकडून अकोला येथील आग़ोपीकिशन बाजोरिया यांचे पूत्र विप्लव बाजोरिया यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला़ त्यांच्या समवेत खा़ बंडू जाधव, आ़ डॉ़ राहुल पाटील, जिल्हाप्रमुख विशाल कदम, संजय कच्छवे आदींची उपस्थिती होती़ त्यानंतर दुपारी २़३० च्या सुमारास काँग्रेसकडून माजी आ़ सुरेश देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला़ यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर, महापौर मीनाताई वरपूडकर, उपमहापौर माजू लाला, माजी उपमहापौर भगवान वाघमारे, अॅड. अशोक सोनी, प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ हत्तीअंबिरे, माजी जिल्हाध्यक्ष बालकिशन चांडक, बाळासाहेब देशमुख, नदीम इनामदार यांच्यासह पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी आदींची उपस्थिती होती़ उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना माजी आ़ सुरेश देशमुख म्हणाले की, काँग्रेस पक्षाचे आपण अधिकृत उमेदवार आहोत़ त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे़ यावेळी सुशीलकुमार देशमुख यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला़अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस२ मे रोजी काँग्रेस व शिवसेनेच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले असले तरी ३ मे रोजीही त्यांच्याकडून आणखी एक-एक अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे़ याशिवाय राष्ट्रवादीचे आ़ बाबाजानी दुर्राणी हेही ३ मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत़ यासाठी राष्ट्रवादी भवन येथून पक्षाचे नगरसेवक, जि़प़ सदस्य व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची रॅली सकाळी ११ वाजता काढण्यात येणार आहे़ यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ़ विजय भांबळे, आ़ मधुसूदन केंद्रे आदींची उपस्थिती राहणार आहे़ उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा ३ मे हा शेवटचा दिवस असल्याने आणखी एक ते दोन जणांचे उमेदवारी अर्ज दाखल होवू शकतात, असे सूत्रांकडून समजते़अंतिम मतदार यादी प्रसिद्धया निवडणुकीसाठी निवडणूक विभागाने अंतीम मतदार यादी एनआयसीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे़त्यानुसार या मतदार संघात ५०३ मतदार असल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकाºयांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे़भाजपाच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्हस्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपाची युती राज्यस्तरावर होणार असल्याची बुधवारी दिवसभर चर्चा होती़ अशातच शिवसेनेने बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला़ भाजपाकडून मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबत बुधवारी कुठल्याही घडामोडी घडल्या नाहीत़गुरुवार हा उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे़ या दिवशी भाजपाकडून उमेदवारी दाखल होते की गेल्या १५ दिवसांपासून या पक्षाकडून उमेदवारी दाखल करण्याची घडविण्यात आलेली चर्चा निरर्थक ठरते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे़
परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणूक :काँग्रेस, शिवसेनेचे अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 12:40 AM