लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : येथील श्री बालाजी मंदिराचा ऐतिहासिक रथोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हजारो भाविकांनी मनोभावे रथ ओढून गाव प्रदक्षिणा घातल्यानंतर रात्री उशिरा साई सेवा प्रतिष्ठानच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत रावण दहन करण्यात आले.गंगाखेड येथील श्री बालाजी मंदिर देवस्थानच्या वतीने दसरा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री तिरुपती बालाजीचे उपपीठ असलेल्या गंगाखेड येथील बालाजी मंदिरात परंपरेनुसार नवरात्रीचा उत्सव झाल्यानंतर १९ आॅक्टोबर रोजी सकाळी मंदिराच्या गाभाऱ्यातील छोट्या रथाची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर दुपारी ३ वाजता मानकºयांच्या उपस्थितीत ३० फुट उंच असलेल्या रथाला शेतातील नवधान्याने सजवून रथात वस्त्रालंकाराने सजविलेली श्री बालाजी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पंचक्रोशितील जमलेल्या हजारो भाविकांनी रथाच्या दोन्ही बाजुंनी बांधलेले दोरखंड ओढून श्री लक्ष्मी रमण गोविंदाचा जयघोष केला. श्री बालाजी मंदिर परिसरातून रथाची मिरवणूक काढून तारुमोहल्ला, शनिमंदिर, रेल्वे स्टेशनरोड, डॉ.आंबेडकर नगर, दिलकश चौक, संत जनाबाई मंदिरमार्गे, बालाजी मंदिरापर्यंत गाव प्रदक्षिणा पूर्ण केली. यावेळी रथाच्या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा जमलेल्या भाविकांनी रथावर बतासे व फुलांची उधळण करीत जागोजागी आरती करुन बालाजीचे दर्शन घेतले. गाव प्रदक्षिणा पूर्ण करुन रथ मंदिरात आल्यानंतर अश्व वाहनातून श्री बालाजी मूर्तीची गाव प्रदक्षिणा काढण्यात आली. रात्री उशिराने शहरातील साई सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित रावण दहन सोहळ्यास आ.डॉ.मधुसूदन केंद्रे, माजीमंत्री सुरेश वरपूडकर, अॅड.गौतम भालेराव, बाळकाका चौधरी, राजकुमार सावंत, अॅड.संतोष मुंडे, शेख युनूस, संयोजक गोविंद यादव, सुशांत चौधरी आदींच्या उपस्थितीत रावण दहन करण्यात आले.४तीस फुटी लाकडी रथाला शेतातील नवधान्याने सजविण्यात आलेल्या रथात वस्त्रलंकाराने सजवलेली श्री बालाजी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. भाविक रथाच्या दोन्ही बाजुने बांधलेले दोरखंड ओढुन श्री लक्ष्मी रमण गोविंदाच्या जयघोष करीत होते. तारू मोहल्ला, शनी मंदिर, रेल्वे स्टेशन रोड, डॉ. आंबेडकर नगर, दिलकश चौक, संत जनाबाई मंदिर मार्गे बालाजी मंदिरपर्यंत गाव प्रदक्षिणा पूर्ण करण्यात आली.
परभणी : ऐतिहासिक रथोत्सव उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:41 AM