लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जागतिक महिला दिनानिमित्त परभणी शहरात रविवारी विविध कार्यक्रम पार पडले़ येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात १२० गुणवंत अंगणवाडी सेविकांचा सत्कार करण्यात आला़जिल्हा परिषदेच्यामहिला व बालविकास विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते़ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी़पी़ पृथ्वीराज यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले़ अध्यक्षस्थानी सभापती शोभाताई घाटगे तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण सभापती अंजली आणेराव, शिक्षणाधिकारी डॉ़ सुचिता पाटेकर यांची उपस्थिती होती़ कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थित असलेल्या दिशा पिंकी शेख यांनी महिलांचे प्रबोधन केले़ त्या म्हणाल्या, समाजात तृतीय पंथीयाबद्दल नकारात्मक भावना आहेत़ तृतीयपंथीयांकडेही एक माणूस म्हणून बघितले पाहिजे़ ज्यावेळी तृतीयपंथीयांकडे तिसरा पंथ म्हणून पाहिले जाते, त्यावेळी पहिला आणि दुसरा पंथ कोणता? प्रथमस्थानी पुरुष की महिला? असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी सर्वांना आत्मचिंतन करण्यास भाग पाडले़ प्रारंभी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ कैलास घोडके यांनी प्रास्ताविक केले़यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी बी़पी़ पृथ्वीराज, शिक्षणाधिकारी डॉ़ सुचिता पाटेकर, प्रा़डॉ़वाघमारे यांनीही मार्गदर्शन केले़ कार्यक्रमात महिला व बालविकास विभागामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या १२० अंगणवाडी सेविकांचा गौरव करण्यात आला़ इंदू तारे यांनी सूत्रसंचालन केले़ करुणा कोकणे यांनी आभार मानले़ कार्यक्रम यशस्वीतेसाठी चौधरी, फड, कुलकर्णी आदींसह कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले़आई म्हणजे चालते बोलते विद्यापीठ -मीरा कदम४परभणी : आई हेच चालते बोलते विद्यापीठ असून, जीवनात पुढे जायचे असेल तर आईची शिकवण, संस्कार घेऊनच मार्गक्रमण करावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या मीरा कदम यांनी केले. येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात सावित्री मंचच्या वतीने ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रांतील महिलांचा सन्मान करण्यात आला होता. व्यासपीठावर ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या सचिव तथा सावित्री मंचच्या अध्यक्षा प्रा.शीतल सोनटक्के, सामाजिक कार्यकर्त्या मीरा कदम, दिशा शेख यांची उपस्थिती होती. मीरा कदम म्हणाल्या, महिलांनी समाजभान ठेवायला पाहिजे. वेदना, दु:ख आपण समाजामध्ये पहावे. तरच जीवन म्हणजे काय हे कळेल. मुलांना जीवशास्त्र शिकविण्यापेक्षा जीवनशास्त्र शिकवावे, असे आवाहन त्यांनी केले.४दिशा पिंकी शेख म्हणाल्या, महिला या जन्मजात स्वतंत्र आहेत. त्यांना स्वतंत्र करण्याची गरज नाही. राष्टÑमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महिलांनी कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. सुनंदा डिघोळकर यांनी नृत्य सादर केले. प्रा.शीतल सोनटक्के यांनी प्रास्ताविकात सावित्री मंचची भूमिका विशद केली़ अंजली बाबर यांनी सूत्रसंचालन केले. पूर्वा धारासूरकर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंचच्या सुरेखा रोडे, अर्चना चाफा कानडे, ज्योती रत्नपारखी, सुचिता मोताफळे, रेखा नायर आदींनी प्रयत्न केले़कृषी विद्यापीठात कार्यक्रमपरभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालयाच्या रासेयो विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त ‘मी सिद्धा, मी स्वयंसिद्धा’ या विषयावर व्याख्यान कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी प्रमुख वक्त्या दिशा शेख, उषाताई अशोक ढवण, डॉ़ संदीप बडगुजर, डॉ़ अनुराधा लाड, सहाय्यक वसतिगृह अधीक्षका डॉ़ मीनाक्षी पाटील, डॉ़ सुनिता पवार यांची प्रमुख उपस्थिती होती़ डॉ़ मीनाक्षी पाटील यांनी प्रास्ताविक केले़ स्रेहल मिटकरी यांनी सूत्रसंचालन केले़
परभणी : सव्वाशे अंगणवाडी सेविकांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2020 10:51 PM