लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात चाºयाची टंचाई निर्माण झाली असून जनावरांसाठी चारा शिल्लक नसल्याने पशुपालक अडचणीत सापडले आहेत. येथील बाजारपेठेमध्ये चाºयाची विक्री होत असली तरी भाव वधारल्याने पशुपालकांच्या अडचणी वाढल्या आहेत.शेतीच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात पशूधनाचा वापर केला जातो. शेतीमध्ये यांत्रिकीकरण आले असले तरी अजूनही ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने शेती केली जात आहे. त्यामुळे जनावरांना जगविण्यासाठी शेतकऱ्यांची ससेहोलपट सुरु आहे. यावर्षी सरासरीच्या तुलनेत अत्यल्प पाऊस झाल्याने खरीप आणि रबी हंगामात चारा उपलब्ध झाला नाही. ज्वारीचे उत्पादनही मागील काही वर्षांच्या तुलनेत कमी झाले आहे. परतीचा पाऊस झाला नसल्याने शेतशिवारांमध्ये उपलब्ध असलेला ओला चाराही संपला आहे. परिणामी शेतकºयांची जनावरे जगविताना तारांबळ उडत आहे. दररोज चारा विकत आणून जनावरे जगविणे मुश्कील झाले असून चाºयाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. जिल्हा प्रशासनाने चारा उपलब्ध करण्यासाठी उपाययोजना केल्या तरी त्या तोकड्या पडत आहेत. चाºयाची टंचाई वाढत असून प्रशासकीय आकडेवारीनुसार जिल्ह्यात मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध असल्याची नोंद आहे. परिणामी चारा छावण्या सुरु करण्यासही अडचणी निर्माण होत आहेत. एकंदर जिल्ह्यात पशुधनाची होरपळ होत असून जिल्हा प्रशासनाने प्रत्यक्ष परिस्थिती लक्षात घेऊन आवश्यक त्या ठिकाणी चारा छावण्या सुरु कराव्यात, अशी मागणी होत आहे.९ लाख मेट्रिक टन : चार उपलब्ध४जिल्हा पशूसंवर्धन विभागाने कृषी विभागाकडून घेतलेल्या पेरण्यांच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात ९ लाख १९ हजार २०८ मे.टन ओला आणि कोरडा चारा उपलब्ध होईल, असे गृहित धरले आहे. परभणी जिल्ह्यात ३ लाख ६२ हजार ७९३ मोठी जनावरे आहेत. ९१ हजार ३१० लहान जनावरे आणि १ लाख ५९ हजार ५५९ शेळ्या, मेंढ्यांची संख्या आहे. या जनावरांसाठी प्रत्येक महिन्यात ७६ हजार ३९३ मे.टन चाºयाची आवश्यकता भासते.४कृषी विभागाकडून प्राप्त झालेल्या पेरणी अहवालानुसार खरीप हंगामात ३ लाख ९५ हजार ८४५, रब्बी हंगामात १ लाख २९ हजार ९१५ मेट्रीक टन असा ५ लाख २५ हजार ७६० मे.टन चारा उपलब्ध होऊ शकतो. तसेच वैरण पिकापासून १ लाख २२ हजार ३९० मे.टन आणि वैरण विकास योजनेंतर्गत राबविलेल्या उपक्रमाद्वारे मिळणारा चारा असा एकूण ३ लाख ९३ हजार ४४९ मे.टन चारा उपलब्ध होऊ शकतो.४सर्व चाºयाची गोळाबेरीज केली असता जिल्ह्यात ९ लाख १९ हजार २०८ मे.टन चारा उपलब्ध होऊ शकतो. हा चारा १ नोव्हेंबर २०१८ पासून २६८ दिवस पुरेल एवढा असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. असे असले तरी प्रत्यक्षात जिल्ह्यात यावर्षी दुष्काळामुळे उत्पादनात मोठी घट झाल्याने अपेक्षित चारा उपलब्ध झाला नाही. परिणामी चाºयाची टंचाई निर्माण झाली आहे.जिल्ह्यार केवळ एक चारा छावणी सुरु४आॅक्टोबर महिन्यापासून जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी गावांच्या यादीत जिल्ह्यातील ७७ गावे वगळता इतर सर्व गावांचा समावेश झाला आहे. त्यामुळे या गावात उपाययोजना करणे गरजेचे आहे. पाणीटंचाई बरोबरच चाºयाचा प्रश्न गंभीर बनला असून त्या दृष्टीने प्रशासकीय हालचाली होत नाहीत.४सध्या गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथे २७ जानेवारीपासून चारा छावणी सुरु झाली असून या छावणीत १ हजार २६२ जनावरे दाखल आहेत. जिंतूर तालुक्यातही चारा छावणी सुरु करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. मात्र अद्याप या प्रस्तावावर निर्णय झाला नाही. प्रशासनाने आवश्यक त्या ठिकाणी चारा छावण्या सुरु कराव्यात, अशी मागणी होत आहे.प्रशासनाने सुरु केल्या चाºयाबाबत उपाययोजना४चारा टंचाईच्या निवारणार्थ प्रशासनाने जिल्ह्यात उपाययोजना सुरु केल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्याबाहेर चारा वाहतूक करण्यास बंदी घातली आहे. गावनिहाय चाराटंचाईचा आराखडा तयार केला जात असून राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून सुमारे ४० हजार शेतकºयांना वैरणीसाठी बियाणे पुरविण्यात आले आहे.४ कामधेनू दत्तक ग्राम योजनेंअंतर्गत २९ गावांमध्ये वैरण विकास कार्यक्रम राबविला जात आहे.विविध वैरण विकास योजनेतून ५ हजार ५२७ हेक्टर क्षेत्रासाठी वैरण बियाणे पुरविण्यात आले आहे. त्याच प्रमाणे वैरण विकास योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे २० लाख रुपयांची मागणी पशूसंवर्धन विभागाने केली आहे.
परभणी : चाऱ्याअभावी होतेय जनावरांची उपासमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2019 12:23 AM