लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ (परभणी) : यावर्षी तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. परतीच्या पावसानेही हुलकावणी दिली. त्यामुळे जमिनीतील पाण्याचे स्त्रोत दिवसेंदिवस कमी होत असल्याने ऊस पीक धोक्यात आले आहे. त्यातच शेतातील ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांना कारखानदार व ऊसतोड मजुरांच्या मागे चकरा माराव्या लागत असल्याने उत्पादक मेटाकुटीला आले आहेत.शेतकºयांना दरवर्षी विविध संकटांचा सामना करावा लागतो. कधी बोंडअळी तर कधी लाल्या रोगाचा. यावर्षी तर दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. मागील वर्षीच्या बोंडअळीच्या संकटाला कंटाळून तालुक्यातील शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली होती. हवामान खात्यानेही यावर्षीही सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. त्यामुळे शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र यावर्षी तालुक्यात ४३७ मि.मी. पाऊस झाला. परतीच्या पावसानेही दगा दिला. यामुळे विहीर, बोअर आदी पाण्याच्या स्त्रोतांची पाणीपातळी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. जमिनीतील पाणीपातळी खोलवर गेल्यामुळे ऊस जगवायचा कसा? असा प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे. उसाला जास्त पाण्याची आवश्यकता असल्यामुळे ऊस पिकासाठी पाण्याचे नियोजन करावे तरी कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.माजलगाव धरणाच्या उजव्या कालव्याचे पाणी तालुक्यात येते. मात्र यावर्षी माजलगाव धरणच मृत साठ्यामध्ये आहे. त्यामुळे येथूून पाणी येणे दुरापास्त आहे. तालुक्यातील अनेक भागातील ऊस सध्या वाळत आहे. तालुक्यात २ हजार ३११ क्षेत्रफळावर उसाची लागवड करण्यात आली आहे. त्यात सरू ऊस ३१६, पूर्व हंगामी ५०५, खोडवा १४९० अशा एकूण ३११ क्षेत्रफळावर उसाची लागवड झाली आहे. कारखान्यांनी ऊस न्यावा यासाठी तालुक्यातील शेतकरी कारखान्याकडे चकरा मारताना दिसत आहे. तालुक्यात एकमेव असलेला महाराष्टÑ शुगर कारखाना सुरू झाला नाही. तसेच ऊस वाळण्यास सुुरुवात झाली असून जेमतेम पाण्यावर जगविलेला ऊस कारखान्याकडे घालण्यासाठी ऊसतोड मजुरांची मनधरणी केली जात आहे. मात्र ऊस तोडणीपूर्वी मजूर हेक्टरी ५ ते ७ हजार रुपयांची मागणी करीत आहेत. काही शेतकºयांनी तोडणीवाल्यांचे हात ओले करून तोडणी करून घेतली. मात्र अजूनही तालुक्यातील अनेक शेतकºयांकडे ऊस तोडणीविना शिल्लक असून शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत.कारखाना बंद : ऊस उत्पादक अडचणीतसोनेपठ तालुक्यात यावर्षी २३११ हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली. गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकºयांनी उसाची लागवड केली. तालुक्यात उसाची लागवड पाहता तालुक्यातील एकमेव महाराष्टÑ शुगर कारखाना सुरू होणे अपेक्षित होते. कारखाना सुरू व्हावा, यासाठी विविध संघटना, राजकीय पक्ष व शेतकºयांनी साखर आयुक्त पुणे यांच्यापर्यंत पाठपुरावा केला; परंतु, शेतकºयांच्या मागणीला यश आले नाही. हा कारखाना अद्यापही सुरू झाला नसल्याने ऊस उत्पादक शेतकºयांना दुसºया तालुक्यासह पर जिल्ह्यातील कारखान्यावर अवलंबून रहावे लागत आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.परभणी जिल्ह्यात यावर्षी दुष्काळी परिस्थिती आहे. मजुरांअभावी ऊसतोडणीही लांबत आहे. दुसरीकडे पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे ऊस जागेवरच वाळू लागला आहे.
परभणी : ऊस तोडण्यासाठी मजूर मिळेनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 12:32 AM