लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचे उत्खनन करून वाळू वाहतूक करणारा एक टिप्पर आणि एक दुचाकी ४ जून रोजी रावराजूर गोदावरी नदीपात्र परिसरात ड्रोन कॅमेºयात कैद झाल्याने टिप्पर चालक, मालक व दुचाकी चालकाविरूद्ध ११ जून रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल झालेल्या एका याचिकेवर सुनावणी झाली होती़ त्यानुसार न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे खंडपीठात दाखल याचिकेवरील न्यायालयाचे स्पष्टीकरण होईपर्यंत गोदावरी नदीपात्रातून वाळू उपसा व वाहूतक करण्यास जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी स्थगिती दिली आहे़ याच दरम्यान, ४ जून रोजी सायंकाळी ५ ते ५़३० वाजेच्या सुमारास पालम तालुक्यातील रावराजूर येथील गोदावरी नदीपात्रात अनुप सावरकर हे ड्रोन कॅमेºयाच्या सहाय्याने वाळूची मोजणी करीत असताना टिप्पर क्रमांक एमएच ०४ सीपी-३८६७ चा चालक व मालक तसेच एमएच २२ डी-५५३२ या दुचाकीचा चालक गोदावरी नदीपात्रातून विनापरवाना वाळूचा उपसा करून टिप्परमध्ये भरीत असताना ड्रोन कॅमेºयात कैद झाले़ जवळपास ३ ब्रास वाळू वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले आहे़या प्रकरणी अनुप सावरकर यांच्याकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी दिलेल्या आदेशावरून टिप्पर चालक, मालक व दुचाकीचा चालक अशा तिघांविरूद्ध रावराजूर सज्जाच्या तलाठी राजश्री प्रभाकरराव देसाई यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे़ अंदाजे १८ हजार रुपये किंमतीची ३ ब्रास वाळू चोरी केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे़ जमादार रतन सावंत या प्रकरणाचा तपास करीत आहेत़ तालुक्यात वाळू घाटांचे लिलाव झाले नसताना आणि जिल्हाधिकाऱ्यांचे स्थगिती आदेश असतानाही सर्रास वाळूचा उपसा केला जात आहे़ रावराजूर घाटावरून वाळू उपसा करणाºयांविरूद्ध गुन्हा दाखल झाल्याने वाळू चोरांचे धाबे दणाणले आहेत़कारवाईनंतरही थांबेना उपसा४जिल्ह्यात गोदावरी, पूर्णा आणि दुधना नदीपात्रातून वाळूचा अवैध उपसा केला जात आहे़ हा वाळू उपसा थांबविण्यासाठी महसूल प्रशासन कारवाया करीत आहे़४महसूल प्रशासनाच्या कारवाईनंतरही अवैध वाळू उपसा करण्याचे प्रकार थांबलेले नाहीत़४गंगाखेड तालुक्यात वाळू घाटाचा लिलाव झालेला नसतानाही सर्रास वाळू उपसा होत आहे़ महसूल व पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़
परभणी : अवैध वाळू उपसा करणारा टिप्पर ड्रोन कॅमेऱ्यात कैद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 11:38 PM