लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशत:, पूर्णत: अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आकृतीबंध लागू करण्यात आला असून तसा आदेश राज्याच्या शिक्षण विभागाने सोमवारी काढला आहे.राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाºयांच्या निकषाच्या अनुषंगाने या कर्मचाºयांची पदे निश्चित करण्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामध्ये लोकप्रतिनिधी व विविध संघटनांचे प्रतिनिधी यांचा समावेश होता. या समितीने ३१ जुलै २०१५ रोजी आपला अहवाल शासनाला दिला. त्यामध्ये शिफारसी सूचविण्यात आल्या. त्यानुसार शिक्षकेत्तर पदांचा सुधारित आकृतीबंद निश्चित करण्याचा निर्णय १३ नोव्हेंबर २०११ च्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार राज्यातील सर्व खाजगी अनुदानित, अंशत: अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाºयांसाठी सुधारित आकृतीबंद लागू करण्यात आला आहे. त्यानुसार पाचवी ते बारावीपर्यंत ५०० पटसंख्या असलेल्या शाळेत एक कनिष्ठ लिपीक, ५०१ ते १ हजार विद्यार्थी संख्येपर्यंतच्या शाळेत एक कनिष्ठ, एक वरिष्ठ लिपीक, १००१ ते १६०० पर्यंतच्या शाळेत २ कनिष्ठ व १ वरिष्ठ लिपीक, १६०१ ते २२०० विद्यार्थी संख्येच्या शाळेत २ कनिष्ठ, १ वरिष्ठ व १ मुख्य लिपीक, २२०१ ते २८०० विद्यार्थी संख्येपर्यंतच्या शाळेत ३ कनिष्ठ लिपीक, १ वरिष्ठ व १ मुख्य लिपीकास मंजुरी देण्यात आली आहे. २८०० पेक्षा जास्त व त्यापुढील प्रत्येक ६०० विद्यार्थ्यांमागे ४ कनिष्ठ, २ वरिष्ठ, २ मुख्य लिपीक राहणार आहेत. सध्या राज्यात १७ हजार ६९५ कनिष्ठ, ४ हजार ९१२ वरिष्ठ व ९२६ मुख्य लिपीक कार्यरत आहेत. या शिवाय अधीक्षक पदही राहणार आहे. तसेच १ हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांसाठी १ पूर्णवेळ ग्रंथपाल पद कार्यरत राहणार आहे, अशी राज्यात २ हजार १८ पदे सध्या कार्यरत आहेत. अर्धवेळ ग्रंथपाल पदावर १६०० कर्मचारी कार्यरत असून ते कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर सदरील पदे व्यपगत होणार आहेत. त्यामुळे ग्रंथपाल पदाचा संवर्ग मृत संवर्ग असल्याने नवीन पद भरती अथवा पद निर्मिती करु नये, असा शाळांना इशारा देण्यात आला आहे. प्रयोगशाळा सहाय्यकाची नववी ते दहावीच्या २०१ ते ७०० विद्यार्थ्यांसाठी १ पद मंजूर असून अशी राज्यात ४ हजार ४८ पदे मंजूर आहेत. ७०१ ते १५०० विद्यार्थी संख्येसाठी १ पद मंजूर असून अशी राज्यात ६१० पदे कार्यरत आहेत. १५०० पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या शाळेत १ पद अधीक्षक पद मंजूर असून अशी एकूण २७ पदे राज्यात मंजूर आहेत. उच्च माध्यमिक शास्त्र शाखा भौतिकशास्त्र यासाठी एक अतिरिक्त प्रयोगशाळा सहाय्यक मंजूर असून अशी राज्यात १ हजार २० पदे कार्यरत आहेत. जीवशास्त्रासाठी १ अतिरिक्त प्रयोगशाळा सहाय्यकाचे पद मंजूर असून यासाठीची १ हजार २० पदे मंजूर आहेत.नवीन भरतीला दिला खोनव्या सुधारित आकृतीबंधामध्ये नवीन पदभरतीला खो देण्यात आला आहे. त्यामध्ये अधीक्षक पदावर कार्यरत राज्यातील १९ कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर सदरची पदे व्यपगत होणार आहेत. या पदावर नवीन भरती करु नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे अर्धवेळ ग्रंथपाल असलेले सध्याचे १६०० कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर ती पदेही व्यपगत होणार असून त्या पदावर नव्याने भरती करु नये, असे स्पष्ट निर्देश आहेत. कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर अतिरिक्त ठरलेली पदे आपोआप व्यपगत होतील, असे या आदेशात नमूद केल्याने खाजगी अंशत: /पूर्णत: अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये यापुढे शिक्षकेत्तर कर्मचाºयांची नवीन भरती होणे अवघड झाले आहे. चतुर्थश्रेणी कर्मचाºयांचा पदासंदर्भातील आकृतीबंध मात्र शिक्षण विभाग नंतर जाहीर करणार आहे.
परभणी : खाजगी शाळांसाठी सुधारित आकृतीबंध लागू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 11:58 PM