शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

परभणी : इनामदार यांचे नाव आपणच सुचविले -प्रणिता नवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2019 12:26 AM

येथील महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदासाठी आपणच अतिक इनामदार यांचे नाव राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी आणि गटनेते जलालोद्दीन काजी यांना सुचविले होते. आपल्या विनंतीनुसारच त्यांचा अर्ज भरला होता, अशी माहिती दिवंगत नगरसेवक अ‍ॅड.विष्णू नवले यांच्या पत्नी प्रणिता नवले यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदासाठी आपणच अतिक इनामदार यांचे नाव राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी आणि गटनेते जलालोद्दीन काजी यांना सुचविले होते. आपल्या विनंतीनुसारच त्यांचा अर्ज भरला होता, अशी माहिती दिवंगत नगरसेवक अ‍ॅड.विष्णू नवले यांच्या पत्नी प्रणिता नवले यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.परभणी मनपातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाट्याला आलेल्या स्वीकृत सदस्यपदावरुन शुक्रवारपासून पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.स्वराजसिंह परिहार, विरोधी पक्षनेते विजय जामकर व इतर १३ नगरसेवकांनी पक्षाच्या वतीने यापूर्वी स्वीकृत सदस्यपदासाठी भरलेला अतिक इनामदार यांचा अर्ज रद्द करण्याचे निवेदन मनपा आयुक्तांना दिले होते. तर नगरसेवकांना विचारात न घेता मनमानी पद्धतीने इनामदार यांचा अर्ज दाखल केल्याच्या कारणावरुन १३ नगरसेवकांनी आपल्याकडे राजीनामे दिल्याचे अ‍ॅड. परिहार यांनी सांगितले होते. त्यानंतर शनिवारी या संदर्भात परभणीत शाही मशीद परिसरातील कार्यालयात आ.दुर्राणी यांनी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी अ‍ॅड.विष्णू नवले यांच्या पत्नी प्रणिता नवले यांची स्वाक्षरी असलेले प्रसिद्धी पत्रक अ‍ॅड. नवले यांचे मेहुणे डॉ.संजय व रवि पवार यांनी पत्रकारांना दिले. निवेदनात प्रणिता नवले यांनी म्हटले आहे की, अ‍ॅड.विष्णू नवले यांच्या निधनानंतर मनपातील स्वीकृत सदस्यपद स्वीकारावे, अशी विनंती आ.दुर्राणी व गटनेते काजी यांनी आपल्या घरी येऊन केली होती; परंतु, आपणास राजकीय क्षेत्रात पुरेसा अनुभव नसल्याने व पतीच्या निधनातून अद्याप सावरले नसल्याने दिवंगत अ‍ॅड. नवले यांचे बालमित्र अतिक अहेमद इनामदार यांना स्वीकृत सदस्यपद देण्याची विनंती आ. दुर्राणी यांच्याकडे केली. त्या विनंतीचा आदर राखून गटनेते काजी यांनी इनामदार यांचा अर्ज दाखल केला; परंतु, अ‍ॅड.नवले ऐवजी आपणास स्वीकृत सदस्यपद मिळावे, यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या काही इच्छुकांनी त्यांची अपेक्षा व मागणी पूर्ण न झाल्याने आ.दुर्राणी यांच्यावर मनमानीचे खोटे आरोप लावले आहेत. या उलट पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व आ.दुर्राणी यांनी आपल्या कुटुंबास न्याय देण्यासाठी पुढाकार घेतला, असेही प्रणिता नवले यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.बदनामी करण्यासाठीच खोटे आरोप -दुर्राणी४ज्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची परभणी शहरात एक शाखाही स्थापन केली नाही किंवा एक बुथ कमिटीही स्थापन केली नाही, असे व्यक्ती पक्षनिष्ठेच्या ढोंगी गप्पा मारत आहेत. केवळ आपली बदनामी व्हावी, या हेतुनेच त्यांनी इनामदार यांच्या उमेदवारीचे कारण पुढे केले आहे. इनामदार यांचे नाव प्रणिता नवले यांनीच सूचविले होते. त्यामुळे त्यामध्ये आपण कोणताही हस्तक्षेप केलेला नाही. अ‍ॅड. विष्णू नवले हे पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आपण पूर्वीही होतो आणि आताही आहे. अ‍ॅड. नवले यांच्याविषयी कळवळा दाखविणारे नवले कुटुंबियांना आतापर्यंत कधी भेटलेही नाहीत. केवळ आर्थिक अपेक्षा ठेवून संबंधितांनी इनामदार यांच्या अर्जाला विरोध केला गेला आहे, अशी प्रतिक्रिया आ.दुर्राणी यांनी दिली.कळवळा दाखविणारे कधीही भेटले नाहीत -पवार४प्रणितातार्इंवर अन्याय झाल्याचा कळवळा दाखविणारे पदाधिकारी कधीही आपणास किंवा आपल्या कुटुंबियास भेटले नाहीत. केवळ राजकीय आकसातून आ.दुर्राणी यांच्यावर खोटे आरोप करीत आहेत. इनामदार यांचे नाव आम्हीच दुर्राणी यांना सूचविले होते, अशी प्रतिक्रिया अ‍ॅड.नवले यांचे मेहुणे डॉ.संजय पवार आणि रवि पवार यांनी दिली.

टॅग्स :parabhaniपरभणीMuncipal Corporationनगर पालिका