लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : सोमवारी पहाटेच्या सुमारास जिल्ह्यातील परभणी, पूर्णा तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली़ तर सोमवारी सायंकाळी जिल्हाभरात वादळी वाऱ्याने नागरिकांची धांदल उडाली़दोन दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरणात बदल झाला आहे़ दिवसभर कडक ऊन पडत असले तरी सायंकाळच्या सुमारास वातावरणात बदल होत आहे़ सोमवारी पहाटे परभणी शहरात वादळी वाºयाला सुरुवात झाली़ सोसाट्याच्या वाºयासह अर्धातास पाऊस झाला़ पूर्णा शहर आणि परिसरातही पहाटे पावसाने हजेरी लावली आहे़ दरम्यान, सोमवारी सायंकाळी ६ वाजेनंतर पुन्हा वातावरणात बदल झाला़ परभणी शहर परिसरात वादळी वारे वाहू लागले़ वाºयामुळे शहराचा वीज पुरवठाही खंडीत झाला़ मानवत, सेलू, गंगाखेड, सोनपेठ, पाथरी, जिंतूर, पालम आदी भागातही सायंकाळी ७़३० वाजेच्या सुमारास वादळी वाºयाला सुरुवात झाली़ सोनपेठ, येलदरी येथे विजांच्या कडकडाटासह वारे वाहू लागले़ सेलू, पाथरी तालुक्यातील लिंबा, पाथरी शहर, जिंतूर शहराह हलका पाऊस झाला़ अचानक वातावरणात बदल झाल्याने नागरिकांची धावपळ झाली़ताडलिमला येथे विद्यार्थिनी जखमीपरभणी तालुक्यातील ताडलिमला, पिंगळी आणि परिसरातील गावांमध्ये सोमवारी पहाटे वादळी वाºयासह पाऊस झाला़ उन्हाळ्याचे दिवस असल्याने ग्रामीण भागात अनेक जण घराबाहेर झोपतात़ अचानक आलेल्या वादळी वाºयामुळे या ग्रामस्थांची धावपळ झाली़ ताडलिमला येथील तांबे कुटूंबिय घराबाहेरील अंगणात झोपले होते़ याच वेळी वादळी वाºयामुळे उडून आलेला एक पत्रा लागून गीता शहाजी तांबे ही १३ वर्षाची मुलगी जखमी झाल्याची घटना घडली आहे़ गीता तांबे हिला ७ ते ८ टाके पडले आहेत, अशी माहिती मिळाली़ सोमवारी सायंकाळच्या सुमारासही पिंगळी व परिसरातील गावांमध्ये वादळी वाºयाने हजेरी लावली़
परभणी, पुर्णेत अवकाळी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 11:52 PM