लोकमत न्यूज नेटवर्कबोरी (परभणी): जिंतूर तालुक्यातील बोरी येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षकांसह अनेक महत्वाची पदे रिक्त असल्यामुळे रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. कायमस्वरुपी वैद्यकीय अधीक्षकांची नेमणूक करावी, यासाठी बोरी ग्रामस्थांनी अनेक वेळा वरिष्ठस्तरावर पाठपुरावा केला आहे; परंतु वरिष्ठ कार्यालयाची उदासीन भूमिका रुग्णांच्या सेवेसाठी कारणीभूत ठरत आहे.या रुग्णालयात येणाऱ्या पंचक्रोशीतील रुग्णांची संख्या मोठी आहे. बोरी गावची लोकसंख्या जवळपास २५ हजार असून परिसरातील तीस ते चाळीस गावातील रुग्ण या ग्रामीण रुग्णालयाशी जोडले गेले आहेत. या गावातून रुग्णांची नेहमीच ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी ये-जा सुरु असते. रुग्णालयाच्या बाह्य विभागात दररोज शंभर ते दीडशे रुग्णांची तपासणी करण्यात येते. सोमवारी आठवडी बाजार असल्याने रुग्ण मोठ्या प्रमाणात उपचारासाठी दाखल होतात. रुग्णालयात विविध विभाग असूनही कर्मचाºयांच्या मनमानी कारभारामुळे रुग्णांंना वेळेवर सुविधा मिळत नाहीत. रुग्णालयात औषधींचा तुटवडा असल्याने बाहेरुन औषधी विकत घ्यावी लागते. त्यातच या ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिकेला टायर मिळत नसल्याने गेल्या दीड महिन्यांपासून ही रुग्णवाहिका जागेवरच उभी आहे. रात्री-बेरात्री परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना ने-आण करण्यासाठी नातेवाईकांना खाजगी वाहनांचा सहारा घ्यावा लागत आहे. खाजगी वाहनधारकांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारुन लूट केली जात आहे. या रुग्णालयातील क्ष-किरण विभाग नेहमीच बंद असल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. या विभागाच्या बंद-चालू या भूमिकेमुळे मागील महिन्यात केवळ १३ रुग्णांचेच एक्सरे काढण्यात आले आहेत. त्यामुळे हे ग्रामीण रुग्णालय सध्यातरी रुग्णांसाठी असुविधेचे माहेरघर बनले असल्याचे रुग्णांमधून बोलल्या जात आहे. रुग्णकल्याण समिती ही नामधारीच आहे का? असा प्रश्नही रुग्ण व नातेवाईकांतून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे या रुग्णालयातील रिक्त असलेली वैद्यकीय अधिकारी, कार्यालयीन अधिक्षक, प्रयोगशाळा सहायक, औषधी निर्माता, वॉर्डबॉय, परिचारिका, वर्ग ४ ची तीन पदे भरावीत, यासाठी वरिष्ठ अधिकारी कार्यालयाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला; परंतु याबाबत कुठल्याही उपाययोजना करण्यात येत नाहीत. त्यामुळे रुग्ण व नातेवाईकांमध्ये रुग्णालय प्रशासनाच्या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.एकाच वैद्यकीय अधिकाºयावर भारबोरी ग्रामीण रुग्णालयात तीन वैद्यकीय अधिकाºयांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी दोन अधिकाºयांची पदे रिक्त आहेत. वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. के. पवार यांच्यावरच या रुग्णालयाचा भार आहे. त्यामुळे शासकीय बैठका, शवविच्छेदन रुग्णसेवा आदी कामे एकाच वैद्यकीय अधिकाºयांना करावी लागत असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे रिक्त पदे तात्काळ भरावीत, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
परभणी : रिक्त पदांमुळे रुग्णांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2018 11:47 PM