लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : वाहन सुस्थितीत असल्याचे उपप्रादेशिक परिवहन विभागाचे प्रमाणपत्र न घेताच अनेक वाहने बिनदिक्कतपणे रस्त्यांवरुन धावत असून, वाढत्या अपघातांना अनफिट वाहनेही तेवढीच जबाबदार ठरत आहेत.फिटनेस प्रमाणपत्र न घेता चालविल्या जाणाऱ्या वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून गंभीर कारवाई होत नसली तरी अशा वाहनांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मात्र गंभीर परिणामांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन विभागानेच ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.दोन दिवसांपूर्वी पाथरीपासून काही अंतरावर असणाºया गंगामसाला परिसरात ट्रॅव्हल्स आणि एका कारच्या झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेने रस्त्यांवरुन धावणाºया वाहनांच्या स्थितीचा आढावा घेतला असता, अनेक वाहने फिटनेस प्रमाणपत्र घेण्यास टाळाटाळ करीत असल्याची बाब पुढे आली आहे. माल वाहू आणि प्रवाशांची वाहतूक करणाºया वाहनांना दोन वर्षांतून एक वेळा फिटनेस प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून फिटनेस चाचणी करुन घेतल्यानंतरच ते वाहन रस्त्यावरुन धावण्यासाठी योग्य असल्याचे मानले जाते. मात्र क्षुल्लक कारणांवरुन वाहनांची फिटनेस चाचणी करण्यास वाहन मालक टाळाटाळ करतात आणि त्यातून अपघातासारख्या घटनांना सामोरे जावे लागते.जिल्ह्यात १८ हजार २९१ वाहने माल वाहू आणि प्रवाशांची वाहतूक करणारी वाहने आहेत. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडे तशी नोंद आहे. त्यापैकी या वर्षात आतापर्यंत केवळ २ हजार ५१५ वाहनधारकांनीच त्यांच्या वाहनांची फिटनेस चाचणी करुन घेतली आहे. किती वाहने फिटनेस चाचणी न करता चालविली जातात, याचा निश्चित आकडा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडे उपलब्ध नसला तरी १८ हजार २९१ वाहनांपैकी बहुतांश वाहनधारक अशी चाचणी न करताच वाहने चालवित असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे वाहनांच्या फिटनेस चाचणीविषयीच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. फिटनेस प्रमाणपत्र न घेतलेली वाहने ‘अनफिट’मध्ये मोडतात. ही वाहने रस्त्यांवर चालविण्यास अयोग्य मानली जातात. अनेक वेळा वाहनांमध्ये किरकोळ बिघाड असतानाही त्याकडे दुर्लक्ष करुन धोकादायक पद्धतीने प्रवाशांची वाहतूक केली जाते. त्यामुळे अपघातासारख्या घटनांना सामोरे जाण्याची वेळ येते. अनेक वेळा समोरच्या व्यक्तीचा दोष नसतानाही त्यास जीव गमवावा लागतो. मग, अशा घटनांना कोण जबाबदार? असा सवाल उपस्थित होत आहे. प्रत्येक वाहनाची वेळीच फिटनेस चाचणी झाली तर अपघातांनाही आळा बसू शकतो. उपप्रादेशिक परिवहन विभागाने या सर्व वाहनांना फिटनेस चाचणी करणे बंधनकारक केले तर अपघाच्या घटनांना पायबंद बसू शकतो. अनेकांचे जीव वाचू शकतात. मात्र फिटनेस चाचणी न करणाºया वाहनधारकांवर गंभीर अशी कारवाई होत नाही. त्यामुळे असे प्रकार वाढत आहेत. तेव्हा फिटनेस चाचणी करुन न घेणाºया वाहनांविरुद्ध गंभीर स्वरुपाची कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.वाहनधारकांना केवळ ४७०० रुपयांचाच दंड४फिटनेस चाचणी न करता वाहन चालविले जात असल्याची बाब निदर्शनास आल्यास संबंधित वाहनधारकाला तरतुदीनुसार केवळ ४ हजार ७०० रुपयांचाच दंड आकारला जातो. उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून साधारणत: ८०० रुपयांमध्ये वाहनांची फिटनेस चाचणी करुन प्रमाणपत्र दिली जाते. त्यानंतरच वाहन चालविण्यास योग्य असल्याचे मानले जाते. मात्र अनेक वाहनधारक ही चाचणी करण्यास टाळाटाळ करतात. त्याला कारणेही तशीच असतात. वेळच्या वेळी आॅईल बदलणे, वाहनांतील आसन व्यवस्था, तुटलेले काच, ब्रेक, ब्रेक लायनर, वाहनांतील वातानुकूलीत सुविधा यासह अनेक छोट्या-मोठ्या बाबी अद्ययावत ठेवाव्या लागतात. त्यामुळे फिटनेस चाचणी न करताच वाहने चालविण्यात धन्यता मानली जाते आणि या प्रकारातूनच अपघातासारखी घटना घडू शकते.पाचशे वाहनधारकांना मेमो४प्रवासी आणि मालवाहू असणाºया तीन व चारचाकी वाहनांना नियमानुसार फिटनेस चाचणी करुन घेणे बंधनकारक आहे. फिटनेस चाचणी न करणाºया ५०० वाहनधारकांना मागील महिन्यातच मेमो दिला आहे.४ याशिवाय उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत वायूवेग पथकांची स्थापना केली असून ही पथके अचानक वाहनांची तपासणी करुन कायदेशीर कारवाई करतात. त्यामुळे फिटनेस प्रमाणपत्र नसणाºया वाहनांवर या कार्यालयातून आवश्यक त्या वेळी कारवाई केली जाते, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत भोसले यांनी दिली.दोन वर्षांनी करावी लागते चाचणी४प्रवासी वाहतूक करण्यासाठी खरेदी केलेल्या वाहनांना दोन वर्षानंतर उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून फिटनेस प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. त्यानंतर वाहनाच्या ८ वर्षांच्या वयापर्यंत प्रत्येक दोन वर्षांनी आणि त्यानंतर प्रत्येक वर्षी फिटनेस प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे.४ही फिटनेस चाचणी करीत असताना एआरटीओ कार्यालयातून वाहनातील सर्व इतंभूत बाबींची तपासणी होते. त्यानंतरच ते वाहन चालविण्यास योग्य असल्याचे प्रमाणपत्र दिले जाते.
परभणी : ‘अनफिट’ वाहनांमुळेच रस्ते अपघातांत भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 12:29 AM