शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

परभणी : बँकेकडे अनुदान वर्ग करण्यास पाथरी उदासिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 12:22 AM

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तालुक्याला १७ कोटी ९४ लाख रुपयांची रक्कम प्राप्त झाली असली तरी अद्यापही ही रक्कम बँकेकडे वर्ग केली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष व्यक्त होत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तालुक्याला १७ कोटी ९४ लाख रुपयांची रक्कम प्राप्त झाली असली तरी अद्यापही ही रक्कम बँकेकडे वर्ग केली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष व्यक्त होत आहे़तालुक्यातील खरिपाची पिके अतिवृष्टीने पाण्याखाली गेली़ उभ्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या खचला होता़ राज्य शासनाने जाहीर केलेल्या मदतीपैकी पहिल्या टप्प्यात ८ कोटी २१ लाख रुपये या तालुक्याला प्राप्त झाले़ ही रक्कम १४ गावांतील शेतकºयांना मदत म्हणून वाटप करण्यात आली़ दुसºया टप्प्यात १३ डिसेंबर रोजी तहसील कार्यालयाला १७ कोटी ९४ लाख रुपये प्राप्त झाले़ ही रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे वर्ग केली जाते; परंतु, महसूल प्रशासनाने अद्यापही नुकसानीची रक्कम बँकेकडे वर्ग केली नाही़ त्यामुळे शेतकºयांच्या खात्यावरही मदत निधी जमा होण्यास विलंब लागणार असल्याने शेतकºयांमध्ये संताप व्यक्त होत आहे़ अनुदानाची रक्कम उपलब्ध होवूनही महसूल प्रशासन विलंब लावत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे़ विशेष म्हणजे जिल्ह्यातील इतर सर्व तहसील कार्यालयांनी त्यांना प्राप्त झालेली रक्कम बँकेकडे वर्ग केली आहे. सेलू आणि पूर्णा तालुक्यात अजून हे काम बाकी आहे. मात्र पाथरी तहसील कार्यालयातून अद्यापही बँकेकडे रक्कम वर्ग केली नसल्याने हा तालुका मागे पडला असून, शेतकºयांत संताप व्यक्त होत आहे.अडचणीत तरी मदत करा४अतिवृष्टीने शेतकरी आर्थिक पेचात सापडला आहे़ शासनाने या शेतकºयांसाठी मदतनिधी देवू केला़; परंतु, हा निधी शेतकºयांच्या खात्यावर वर्ग केला जात नाही़४निष्क्रीय यंत्रणा आणखी किती दिवस शेतकºयांना वेठीस धरणार आहे? असा सवाल करीत अडचणीच्या काळात तरी अनुदानाचे त्वरित वाटप करावे, अशी मागणी बाजार समितीचे उपसभापती एकनाथ शिंदे यांनी केली आहे़पहिल्या टप्प्यातील दुष्काळी अनुदान बँकेकडून वाटप करण्यात आले़ मात्र दुसºया टप्प्यातील अनुदान आजपर्यंत बँकेला प्राप्त झाले नाही़-एच़एम़ टोणगे, शाखा व्यवस्थापक, पीडीसीसी बँक, पाथरी

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीbankबँकRainपाऊस