लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यासह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे पावसाअभावी दुष्काळाने ंिचंतेत असलेल्या शेतकऱ्यांसमोर अळीचे नवे संकट उभे टाकले आहे.अर्धा पावसाळा संपत आला असून, अद्यापपर्यंत वार्षिक सरासरीच्या ५० टक्के देखील पाऊस जिल्ह्यात झाला नाही. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. मागील आठवड्यात काही भागात पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान, लष्करी अळीचा बंदोबस्त कसा करावा, याविषयी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी शेतकºयांना मार्गदर्शन केले आहे.शास्त्रज्ञांच्या सल्ल्यानुसार मका पिकाभोवती नेपियर गवताच्या ३ ते ४ ओळी लावाव्यात, हे गवत सापळा पीक म्हणून कार्य करते. या गवतावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास ५ टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडीरॅक्टीन १५०० पीपीएम ५० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. वेळेवर कोळपणी व खुरपणी करुन शेत तणमुक्त ठेवावे, अंडीपुंज समूहातील लहान अळ्या आणि मोठ्या अळ्या हाताने वेचून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून नष्ट कराव्यात, मक्यावरील लष्करी अळीच्या सर्वेक्षणासाठी एकरी ५ कामगंध सापळ्यांचा वापर आणि प्रत्यक्ष शेताचे निरीक्षण करावे, सामूहिकरीत्या मोठ्या प्रमाणात नर पतंग आकर्षित करुन मारावेत, यासाठी १५ कामगंध सापळे प्रति एकरी लावावेत तसेच प्रकाश सापळे लावावेत. किडींचे नैसर्गिक शस्त्रू ढालकिडा, मोठ्या डोळ्याचा ढेकूण इ. परभक्षी व ट्रायकोग्रामा, टिलोनेमस, कॅम्पोलेटीस इ. परोपजीवी कीटकांचे संवर्धन करावे, असे आवाहन कीटकशास्त्रज्ञांनी केले आहे.परभणी जिल्ह्यात यावर्षी पीक परिस्थिती नाजूक आहे़ पावसाचा मोठा ताण पडल्याने पिकांच्या वाढी खुंटल्या असून, पिके जगविताना शेतकºयांना तारेवरची कसरत करावी लागत आहे़ त्यातच लष्करी अळी, बोंडअळी, मावा व इतर किडींचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी त्रस्त आहेत़लष्करी अळी प्रामुख्याने मका या पिकासह सोयाबीन व इतर प्रमुख पिकांवरही आढळत आहे़ पिकांची पाने कुरतडून खालल्याने पिके जळण्याचे प्रमाण वाढत आहे़ त्यामुळे या लष्करी अळीचा वेळीच बंदोबस्त करावा, असे आवाहन कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केले आहे़
परभणी : मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 12:23 AM