अन्वर लिंबेकर।लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेच्या वतीने मुलांचा वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीसाठी १५ लाख रुपये खर्च करून गुंजेगाव जिल्हा परिषद शाळेत उभारण्यात आलेल्या विज्ञान केंंद्राचा गुंजेगाव व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये प्राथमिक शिक्षण घेताना विज्ञानाची गोडी निर्माण होऊन विद्यार्थ्यांमधील चौकसपणा व सृजनशील कला- गुणांना वाव मिळावा आणि त्यांच्यात विज्ञान आणि गणित विषयांची आवड निर्माण व्हावी, या उदात्त हेतूने तालुक्यात चार नाविन्यपूर्ण विज्ञान केंदे्र उभारण्यात आली आहेत. यामध्ये गुंजेगाव जिल्हा परिषद शाळेत उभारण्यात आलेल्या विज्ञान केंद्रात चुुंबकीय क्षेत्र, जादूचा पाण्याचा नळ, विद्युत वाहक विद्युत रोधक, कृत्रिम उपग्रह, पवनचक्की, रेडीओ मिटर, विलक्षण चेंडू, पायथागोरस सिद्धांत, मेंदूची रचना, सूक्ष्मदर्शक यंत्र, विद्युत चक्रव्यूह, मानवी डोळ्यांची रचना असे ५२५ वैज्ञानिक प्रयोग शिकविले जाणार आहेत.यामुळे विज्ञान प्रात्यक्षिक अध्ययन, अध्यापन सुलभ आणि सखोल होण्यास मदत होणार आहे.जिल्हा परिषद शाळेत अनोखे असे नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र सुरू झाले आहे. दुसरी ते आठवीच्या अभ्यासक्रमावर आधारित सर्व वैज्ञानिक साहित्य विज्ञान केंद्रात बसविण्यात आल्याने या विज्ञान केंद्रात उपलब्ध साहित्याद्वारे ५२५ प्रयोग शिकविता येणार आहेत.शाळेतील विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानाबरोबर प्रत्यक्ष विज्ञानाचे साहित्य हाताळल्याने विज्ञान विषयाची सखोल माहिती आणि बारकावे समजण्यास मदत होणार आहे.दररोज परिपाठात एका प्रयोगाचे सादरीकरण करण्यात येत आहे. तेव्हा परिसरातील इतर शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांना गुंजेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विज्ञान केंद्रात घेऊन जावे. येथे भेट दिल्यास वैज्ञानिक प्रयोगाचे सखोल मार्गदर्शन केले जाईल, असे मुख्याध्यापक व्यंकटराव ढेले यांनी सांगितले.
परभणी : नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्राचा विद्यार्थ्यांना होणार फायदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 12:19 AM