परभणी: काँग्रेसच्या १८ इच्छुकांनी दिल्या मुलाखती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 12:19 AM2019-07-31T00:19:19+5:302019-07-31T00:20:51+5:30

जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात १८ इच्छुक उमेदवारांनी मंगळवारी उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या़ गंगाखेडसाठी एकही इच्छुक पुढे आला नाही तर जिंतूरमध्ये ऐनवेळी एकाने मुलाखत दिली़

Parbhani: Interviews by 3 aspirants of Congress | परभणी: काँग्रेसच्या १८ इच्छुकांनी दिल्या मुलाखती

परभणी: काँग्रेसच्या १८ इच्छुकांनी दिल्या मुलाखती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात १८ इच्छुक उमेदवारांनी मंगळवारी उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या़ गंगाखेडसाठी एकही इच्छुक पुढे आला नाही तर जिंतूरमध्ये ऐनवेळी एकाने मुलाखत दिली़
जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे़ त्या दृष्टीकोनातून विविध राजकीय पक्षांची तयारी सुरू झाली आहे़ राष्ट्रवादी काँग्रेसची मुलाखत प्रक्रिया पार पडल्यानंतर बुधवारी काँग्रेसच्या वतीने शहरातील शनिवार बाजार भागातील जिल्हा कार्यालयात मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते़ जिल्हा प्रभारी आ़ डी़पी़ सावंत, भीमराव डोंगरे यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या़ यावेळी परभणी विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक म्हणजे तब्बल १६ जणांनी मुलाखती दिल्या़ यामध्ये माजी खा़ तुकाराम रेंगे, माजी आ़ सुरेश देशमुख, माजी उपमहापौर भगवान वाघमारे, नदीम इनामदार, गणेश देशमुख, सिद्धार्थ हत्तीअंबिरे, रविराज देशमुख, सय्यद समी सय्यद साहब जान, सचिन अंबिलवादे, विशाल बुधवंत, बाळासाहेब देशमुख, सुनील देशमुख, सुरेश नागरे, मलिका गफार, मुजाहीद खान, सचिन देशमुख यांचा समावेश होता़ पाथरी विधानसभा मतदारसंघातून जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांनी मुलाखत दिली तर जिंतूर विधानसभा मतदारसंघात एकाही इच्छुकाने अर्ज दाखल केला नव्हता़ त्यामुळे पूर्वनियोजित यादी कोरीच होती़
ऐनवेळी युवक काँग्रेसचे पदाधिकारी नागसेन भेरजे यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी मुलाखत दिली़ गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून माजी तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी अर्ज दाखल केला होता; परंतु, त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली़ त्यानंतर वंचितकडे त्यांनी मुलाखतही दिली़ त्यामुळे काँग्रेसकडे गंगाखेडमधून निवडणूक लढवू इच्छिणारा उमेदवारच राहिला नाही़ त्यामुळे गंगाखेडची पाटी काँग्रेससाठी कोरीच राहिली़
या मतदरसंघातून इतर तगड्या उमेदवाराला उमेदवारी द्यावी, अशी मागणी काँग्रेसच्या काही नेत्यांनी केली;परंतु, आघाडीच्या तडजोडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असल्याने तसा निर्णय होण्याची शक्यता कमीच आहे़
स्थानिकाच्या उमेदवारीसाठी आग्रह
४परभणी विधानसभा मतदारसंघातून स्थानिक उमेदवारांनाच प्राधान्य देण्याची मागणी यावेळी उपस्थितांनी केली़ ऐनवेळी इतर पक्षातून येणारा किंवा पक्षात प्रवेश न करताच उमेदवारी मागणाऱ्या इच्छुकांना उमेदवार देवू नये़ त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाईल, अशी एकमुखी मागणी उपस्थितांनी केली़ यावरून यावेळी बरीच चर्चाही झाली़
४आता पुढील आठवड्यात काँग्रेस पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाची मुंबईत बैठक होणार आहे़ या बैठकीनंतर पक्षाच्या उमेदवारांची घोषणा होणार आहे़

Web Title: Parbhani: Interviews by 3 aspirants of Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.