लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: येथील सावली विश्रामगृहात ३१ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील चारही विधानसभांसाठी निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती भारतीय जनता पक्षाच्या वतीने घेण्यात आल्या. सकाळी ११ वाजेपासून ते सायंकाळपर्यंत या मुलाखती चालल्या. त्यात एकूण ५२ जणांनी मुलाखती दिल्याची माहिती मिळाली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा ३० आॅगस्ट रोजी परभणी जिल्ह्यातून हिंगोलीकडे मार्गस्थ झाली. त्यानंतर दुसºया दिवशी जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी भाजपाचे नेते तथा राज्यमंत्री संजय भेगडे हे ३१ आॅगस्ट रोेजी परभणीत दाखल झाले. संजय भेगडे यांनी चारही मतदारसंघातील इच्छुक उमदेवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत.पाथरी विधानसभा मतदारसंघातून १३ जणांनी मुलाखती दिल्या. त्यात आ.मोहन फड, प्रा.पी.डी. पाटील, डॉ.मंजुषा चौधरी, शाम गलबे, बाबासाहेब फले, महादेव गिºहे, रंगनाथ सोळंके, दत्तात्रय कदम, शिवाजी मव्हाळे, रमाकांत जहागीरदार, डॉ.उमेश देशमुख, हनुमान सावंत यांचा समावेश आहे. गंगाखेड विधानसभा मतदारसंघासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष अभय चाटे, माजी आ.विजय गव्हाणे, बालाजी देसाई, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भुमरे, शामसुंदर मुंडे, लिंबाजी भोसले, अनंत बनसोडे, रमेश गोळेगावकर, रामकिशन रौंदळे, विश्वनाथ सोळंके, विठ्ठल रबदडे, जि.प. सदस्य सुभाष कदम, रामप्रभू मुंडे, गणेशराव रोकडे, डॉ.रामराव केंद्रे, गणेश घोरपडे, डॉ.बडेसाब शेख या १७ जणांनी मुलाखती दिल्या असल्याची माहिती मिळाली.परभणी, जिंतूरमधून २२ जण इच्छुक४परभणी विधानसभा मतदारसंघासाठी भाजपाचे शहर महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, डॉ. मीना परतानी, मोहन कुलकर्णी, मनपातील भाजपाच्या गटनेत्या मंगल मुद्गलकर, अभिजीत धानोरकर, चंद्रकांत चौधरी, सुनील देशमुख, रमेश गोळेगावकर, शंकर भालेकर, अजय गव्हाणे या १० जणांनी मुलाखती दिल्या.४जिंतूर विधानसभा मतदारसंघासाठी माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर, मेघना साकोरे- बोर्डीकर, समीर दुधगावकर, गणेश काजळे, डॉ.माधव सानप, संजय साडेगावकर, शशिकांत देशपांडे, राजेश वट्टमवार, खंडेराव आघाव, डॉ.गुलाब सांगळे, जिजाराव गिते, अशोक खताळ या १२ जणांनी मुलाखती दिल्या आहेत. सावली विश्रामगृहात शनिवारी सकाळीपासून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यामुळे कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती.
परभणी : चार मतदारसंघांत ५२ इच्छुकांनी दिल्या भाजपासाठी मुलाखती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2019 12:26 AM