लोकमत न्यूज नेटवर्कवालूर/देवगावफाटा (परभणी): कृषी प्रधान देशात शेतीसाठी लागणाऱ्या स्वस्त आणि सुटसुटीत कृषीपंपापासून ते सैन्यामध्ये शत्रूच्या हातातील शस्त्र म्हणून ओळखणाºया रोबोटच्या निर्मितीचे प्रयोग सादर करून जिल्ह्यातील बालवैज्ञानिकांनी आपल्या कुशाग्र बुद्धीमत्तेचे दर्शन घडविले आहे़सेलू तालुक्यातील वालूर येथील शांताबाई नखाते विद्यालयात ३० डिसेंबर रोजी जिल्हास्तारीय विज्ञानप्रदर्शन पार पडले़ या प्रदर्शनात जिल्ह्यातील बाल वैज्ञानिकांनी सादर केलेल्या प्रयोगातून नवे अविष्कार समोर आणले आहेत़ या बालवैज्ञानिकांनी शेती, सिंचन यासह समाजघटकांत बहुउपयोगी असलेल्या प्रयोगांचे सादरीकरण केले़ग्रामीण भागात शेती हा मुख्य व्यवसाय आहे़ ग्रामीण भागातील घटत असलेली पाणी पातळी व उपलब्ध पाण्यावर शेतीसाठी वरदान ठरणारा अत्यल्प खर्चाचा स्वयंचलित कृषीपंप या प्रदर्शनात आकर्षण ठरला़ मानवत येथील शकुंतला कत्रूवार विद्यालयातील बाल वैज्ञानिक संस्कार रुद्रकंठवार याने हा पंप सादर केला आहे़ हा कृषीपंप कमी खर्चात तयार होतो़ विशेष म्हणजे पाण्याच्या पातळीप्रमाणे पंप चालतो आणि विशिष्ट पातळीला तो आपोआप बंद होतो, असे संस्कारने सांगितले़ पाथरी येथील नेताजी सुभाष विद्यालयातील शेख अयुब रहेमान या बाल वैज्ञानिकानेही शेतकऱ्यांना सोयस्कर असलेला प्रयोग सादर केला आहे़ निसर्गाच्या लहरीपणामुळे घटणारे कृषी उत्पादन वाढविण्यासाठी सेंद्रीय शेती कशी फायदेशीर आहे, ते शेख अय्युब याने आपल्या प्रयोगातून मांडले आहे़ सोनपेठ तालुक्यातील करम येथील विद्यार्थी सार्थक सावंत याने गणितीय पद्धतीची सोपी मांडणी प्रयोगातून सांगितली़ दशांश अपूर्णांकच्या अंकाची स्थानिक किंमत पारंपारिक पद्धतीऐवजी सोप्या पद्धतीने काढण्याचे त्याने प्रयोगातून सिद्ध केले़ कै़ जामकर विद्यालयातील शेख सलमान या बाल वैज्ञानिकाने तर मानवी रोबोटच प्रयोगातून सादर केला़ हा रोबोट शस्त्र जवळ असलेल्या शत्रूला ओळखतो़ गुगल ड्राईव्हमधून बनविलेला हा मानवी रोबोट आकर्षण ठरला़ पाथरी येथील शांताबाई नखाते विद्यालयातील जैद खान पठाण या बाल वैज्ञानिकाने स्मार्ट शिट्टी ही संकल्पना प्रयोगातून सादर केली़ घरात प्रवेश करताना किंवा एखादी संशयास्पद वस्तू आढळली, आग लागली तर ही शिट्टी पूर्व कल्पना देते़ हा प्रयोगही लक्ष वेधक ठरला़ गवत कापणी यंत्र, शेत कुंपन संरक्षण यंत्र, प्लास्टिकपासून पेट्रोल निर्मिती, सौर उर्जा, आधुनिक सैन्य यासह अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग विद्यार्थ्यांनी सादर केले़पृथ्वीराज यांच्या हस्ते उद्घाटन४वालूर- जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या वतीने येथे आयोजित ४५ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन जि़प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी बी़पी़ पृथ्वीराज यांच्या हस्ते झाले़ अध्यक्षस्थानी जि़प़ अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड तर प्रमुख पाहुणे म्हणून समाजकल्याण विभागाचे औरंगाबाद येथील प्रादेशिक उपायुक्त जलील शेख, जि़प़ उपाध्यक्षा भावनाताई नखाते, सभापती अशोक काकडे, समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले, पं़स़ सभापती पप्पू गाडेकर, उपसभापती आनंद डोईफोडे, सभापती अनिलराव नखाते, जि़प़ सदस्य राजेंद्र लहाने, राम खराबे, माजी उपसभापती गोरख भालेराव, सरपंच संजय साडेगावकर, अजय चौधरी, रामलू नागेश्वर, गोविंदराव देशमुख, पांडूरंग रोकडे, शेख इस्माईल, रमाकांत चौधरी, गणेशराव मुंडे, विलास सोनवणे, लिंबाजी कलाल, अच्युतराव आंधळे, मा़मा़ सुर्वे, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ़ वंदना वाव्हुळ, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ़ सुचिता पाटेकर, निरंतर शिक्षणाधिकारी सविता बिरगे आदींची उपस्थिती होती़
परभणी : कृषीपंप अन् रोबोटद्वारे घडविला संशोधन अविष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 12:47 AM