शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

परभणी : अमरदीप रोडे खून प्रकरणाचा तपास सीआयडीमार्फत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 11:14 PM

येथील नगरसेवक अमरदीप रोडे यांच्या खून प्रकरणाचा तपास सीआयडीमार्फत करावा, अशी मागणी करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील नगरसेवक अमरदीप रोडे यांच्या खून प्रकरणाचा तपास सीआयडीमार्फत करावा, अशी मागणी करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.नगरसेवक अमरदीप रोडे यांच्या खून प्रकरणात सुरु असलेल्या तपासाविषयी शंका व्यक्त करीत २२ एप्रिल रोजी परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महिला, पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलना दरम्यान अनेकांनी आपल्या मार्गदर्शनातून या खून प्रकरणात होत असलेली दिरंगाई उपस्थितांसमोर मांडली. आरोपींची माहिती दिल्यानंतरही त्यांना अटक करण्यास जाणीवपूर्वक विलंब लावला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.या प्रसंगी रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे म्हणाले, रोडे यांच्या हत्येमागे कोणाचे षडयंत्र आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलीस प्रशासन संथ गतीने तपास करीत आहे. तेव्हा या प्रकरणाचा तपास सीआयडीमार्फत करावा, अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या निवेदनात या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधाराला अटक करावी, गुन्ह्यातील तलवार आरोपींकडून जप्त करण्यात आलेली नाही. ती जप्त करावी, आरोपींबाबत वारंवार माहिती दिल्यानंतरही आरोपींना अटक करण्यास जाणीवपूर्वक विलंब करण्यात येत आहे. फिंगरप्रिंट व डॉग युनिटची मदत न घेता तपास केला जात आहे इ. आरोप करीत आरोपीस सहाय्य करणाºया तपासी अंमलदारास निलंबित करावे, हा खटला अंडर ट्रायल चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, साक्षीदारांना संरक्षण देऊन उर्वरित आरोपींना अटक करावी आदी मागण्या करण्यात आल्या.या आंदोलनात सुधीर साळवे, पवनकुमार शिंदे, नगरसेवक सुशील कांबळे, किरण घोंगडे, आकाश लहाने, प्रदीप वाहुळे, अमोल गायकवाड, उमेश लहाने, सुधीर कांबळे, सुभाष जोंधळे, सिद्धार्थ कसारे, राहुल कनकुटे, रवि खंदारे, विनायक साळवे, संदीप खाडे, नागसेन घागरमाळे, सुमेध डोळसे, कपिल पैठणे, सचिन खरात, तुषार कांबळे, आनंद ढाले, नीलेश डुमणे, गौतम निवडुंगे, बंटी पगारे, धम्मदीप रोडे, आर.आर. रोडे, विजय झोडपे, आशाताई मालसमिंदर, द्वारकाबाई गंडले, लक्ष्मीबाई बनसोडे, राणूबाई वायवळ, पार्वतीबाई कांबळे, कालिंदा घागरमाळे, रेखा आवटे, नंदा गायकवाड, मथुराबाई भद्रे आदींसह बहुसंख्य नागरिक सहभागी झाले होते.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीMurderखून