शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तब्बल ७,९९५ उमेदवार, सर्वच पक्षांत बंडखोरही भारंभार, १०,९०५ उमेदवारी अर्ज दाखल
2
कॅनडात टेस्ला कारचा अपघातामुळे स्फोट; नाशिकचा युवक ठार, डीएनएवरून पटली ओळख 
3
अयोध्येत ५५ घाटांवर २८ लाख दिवे लागणार, ऐतिहासिक दीपोत्सवाचा मोठा उत्साह
4
आरडीएक्सने स्फोट करून रेल्वे स्थानक उडवून देण्याची धमकी, सुरक्षा यंत्रणेत खळबळ
5
इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये ६० जण ठार; मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचे प्रमाण अधिक
6
तीन वर्षांत बावनकुळेंच्या संपत्तीत ३९ टक्क्यांनी वाढ; नावावर एकही कार नाही
7
"वेळ बदलते, फार उशीर लागत नाही"; श्रीनिवास पवारांचे अजित पवारांच्या वर्मावर बोट
8
Smriti Mandhana चा शतकी तोरा; न्यूझीलंड विरुद्ध हरमनप्रीत ब्रिगेडनं दिमाखात जिंकली मालिका
9
महायुतीपाठोपाठ मविआचाही आकडा आला; पवारांना ८७, झगडणाऱ्या काँग्रेस-ठाकरेंना किती जागा?
10
ऑनलाइन बेटिंगशी संबंधित वेबसाइटवर ईडीचा छापा, करोडोंची मालमत्ता जप्त
11
AI'च्या मदतीने अखनूरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा; लष्कराने यशस्वी ऑपरेशननंतर खुलासा केला
12
नाना पटोलेंनी तिकिट विकलं; माजी आमदारानं गंभीर आरोप करत भरला अपक्ष उमेदवारी अर्ज
13
"आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही"; मलिकांना उमेदवारी मिळाल्यानंतर भाजपची स्पष्ट भूमिका
14
हरिद्वारमध्ये ट्रेन उडवण्याचा कट; ट्रॅकवर आढळला डेटोनेट, संशयित तरुण ताब्यात
15
काँग्रेसने तिकीट दिलं, पण एबी फॉर्मच दिला नाही; दिलीप मानेंनी अपक्ष भरला अर्ज
16
IND vs NZ : भारताला भारतात पराभूत करणं शक्य आहे, हे आम्ही दाखवून दिलं - टीम साऊदी
17
हरयाणा निवडणुकीबाबत काँग्रेसचे आरोप फेटाळले, निवडणूक आयोगाने १६०० पानांचं दिलं उत्तर
18
अचानक Instagram डाऊन; मेसेज पाठवण्यात अडचणी, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस...
19
महायुतीसमोर मताधिक्य राखण्याचे आव्हान, मविआची 'या' 11 मतदारसंघात काय होती स्थिती?
20
'दाऊदचा साथीदार फडणवीसांच्या जवळ..', मलिकांच्या उमेदवारीवरुन चतुर्वेदींची बोचरी टीका

परभणी : मुळी बंधाऱ्याने १७०५ हेक्टरवर सिंचन वाढले ; गोदावरी पाटबंधारे महामंडळाचा अजब अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 11:26 PM

गंगाखेड तालुक्यातील गोदावरी नदीवरील मुळी बंधाºयाला दरवाजे नसल्याने पुर्ण क्षमतेने पाणीसाठा होत नसताना औरंगाबाद येथील गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने या बंधाºयामुळे ११़३५ दलघमी पाणीसाठा निर्माण झाला असून, १७०५ हेक्टर सिंचन क्षमता झाल्याचा दावा करून ११ गावांना त्याचा लाभ झाल्याचा अहवाल नुकत्याच नागपूर येथे झालेल्या विधीमंडळाच्या अधिवेशनात सादर केला आहे़ त्यामुळे प्रत्यक्ष स्थळ स्थितीचा विचार न करता कागदोपत्री केलेले हे ‘सिंचन’ चर्चेचा विषय झाला आहे़

अभिमन्यू कांबळे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : गंगाखेड तालुक्यातील गोदावरी नदीवरील मुळी बंधाºयाला दरवाजे नसल्याने पुर्ण क्षमतेने पाणीसाठा होत नसताना औरंगाबाद येथील गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने या बंधाºयामुळे ११़३५ दलघमी पाणीसाठा निर्माण झाला असून, १७०५ हेक्टर सिंचन क्षमता झाल्याचा दावा करून ११ गावांना त्याचा लाभ झाल्याचा अहवाल नुकत्याच नागपूर येथे झालेल्या विधीमंडळाच्या अधिवेशनात सादर केला आहे़ त्यामुळे प्रत्यक्ष स्थळ स्थितीचा विचार न करता कागदोपत्री केलेले हे ‘सिंचन’ चर्चेचा विषय झाला आहे़नागपूर येथे नुकत्याच झालेल्या राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहात औरंगाबाद येथील मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने २०१६-१७ या वार्षिक वर्षाचा आपला अहवाल सादर केला आहे़ या अहवालात यावर्षात विभागातील मोठे, मध्यम, लघु, उपसा प्रकल्पांना मिळालेला निधी, झालेली कामे, सिंचन क्षमतेत झालेली वाढ व प्रकल्पांची स्थिती याचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे़ या अहवालात मागील तीन वर्षातील महामंडळांतर्गत प्रकल्पांच्या ठळक उपलब्धी देण्यात आल्या आहेत़ त्यामध्ये गोदावरी नदीवर परभणी जिल्ह्यातील ढालेगाव, मुदगल, मुळी व डिग्रस या चार बंधाऱ्यांसंदर्भातील माहिती देण्यात आली आहे़ मुळी बंधाºयासंदर्भात दिलेली माहिती कागदोपत्री योग्य ती जुळविण्यात आली असून, सत्य स्थिती लपवून या बंधाºयाचा कसा फायदा झाला आहे, हेच दाखविण्याचा खटाटोप करण्यात आला आहे़ अहवालानुसार मुळी बंधाºयाचे काम २०११ मध्ये पूर्ण झाले असून, यामध्ये ११़३५ दलघमी पाणी साठा निर्माण झाला व १७०५ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे़ त्याचा लाभ गंगाखेड तालुक्यातील ८ व सोनपेठ तालुक्यातील ३ अशा एकूण ११ गावांना झाल्याचा दावा करण्यात आला आहे़ परभणी जिल्ह्याशी संबंधित नसलेल्या व्यक्तींना गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचा हा अहवाल सत्य वाटू शकतो़ प्रत्यक्षात मात्र बंधाºयाची स्थिती वेगळी आहे़ बंधाºयात फक्त दोन फुटच पाणीसाठा होत आहे़ २०११ मध्ये या बंधाºयाचे काम पूर्ण झाल्यानंतर २०१२ मध्ये या बंधाºयावर २० स्वयंचलित दरवाजे बसविण्यात आले़ त्यानंतर पहिल्याच पावसाळ्यात यातील ७ दरवाजे निखळून पडल्याने बंधाºयात साचलेले पाणी वाहून गेले़ त्यानंतरच्या कालावधीत फारसा पाऊस झाला नसल्याने बंधाºयात पाणी साठविण्याचा प्रश्नच आला नाही़ २०१६ मध्ये निखळून पडलेले ७ दरवाजे पाटबंधारे महामंडळाने बसविले़ त्यानंतर नोव्हेंबर २०१६ मध्ये बºयापैकी पाऊस झाल्याने बंधाºयात पाणी साठवण्यास सुरुवात झाली़ पाणीसाठा वाढल्याने पाण्याचा दाब वाढला़ त्यामुळे या महिन्यात या बंधाºयाचे १७ दरवाजे पुन्हा निखळून पडले़ त्यामुळे पुन्हा बंधाºयातील पाणी वाहून गेले़ त्यानंतर तब्बल तीन वर्षांपासून सातत्याने या बंधाºयाला व्हार्टीकल दरवाजे बसविण्याची मागणी या भागातील शेतकरी व नागरिक करीत आहेत़ यासाठी वेळोवेळी रास्ता रोको, धरणे आंदोलन करण्यात आले; परंतु, हा प्रश्न सोडविण्यात आला नाही़ तो तसाच प्रलंबित ठेवण्यात आला आहे़ अशा स्थितीत या बंधाºयामुळे सिंचन क्षमता वाढल्याचा दावा करणे कितपत सत्य आहे? असा सवाल उपस्थित होत आहे़ अधिकारीस्तरावर आकड्यांचा ताळमेळ बसवून असे अहवाल दिले जातात़ त्यानंतर शासन सर्व काही सुजलाम् सुफलाम् असल्याचे समजून इतर सिंचन प्रकल्पांसाठी आखडता हात घेते़ परिणामी जुने प्रकल्प बंंद पडलेले असता व नविन प्रकल्पांना निधी नसल्याने कारण सांगूण मंजुरी मिळत नाही़ ही स्थिती संपूर्ण मराठवाडाभर आहे़ याचे गांभिर्य मात्र अधिकाºयांना वाटत नाही़ त्यामुळे आता जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीच यासाठी पुढाकार घेऊन कागदी ताळमेळ घालणाºया अधिकाºयांना याचा जाब विचारणे आवश्यक आहे़ढालेगाव, मुदगल, डिग्रसचा ५७ गावांना लाभगेदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या २०१६-१७ च्या वार्षिक अहवालात ढालेगाव, मुदगल व डिग्रस या गोदावरी नदीवरील तीन बंधाºयांच्या पाणी साठ्याचा ५७ गावांना लाभ झाल्याचे नमूद करण्यात आले आहे़ ढालेगाव बंधाºयाचे काम २०११ साली पूर्ण झाले असून, यामध्ये १४़८७ दलघमी पाणीसाठा निर्माण झाला व २१०० हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली़ त्याचा पाथरी तालुक्यातील १० व माजलगाव तालुक्यातील ३ गावांना लाभ झाला़ मुदगल बंधाºयाचे काम २०१२ मध्ये पूर्ण झाले़ यामुळे ११़८७ दलघमी पाणीसाठा निर्माण झाला व १९०० हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली़ त्याचा लाभ पाथरी तालुक्यातील ८, सोनपेठ तालुक्यातील ४, माजलगाव तालुक्यातील ३ व परळी तालुक्यातील एका गावास झाला, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे़ डिग्रस बंधाºयाचे काम २०१० साली पूर्ण झाले असून, यामध्ये ६३़८५ दलघमी पाणीसाठा निर्माण झाला व ३६१८ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे़ याचा लाभ पूर्णा तालुक्यातील १०, परभणी तालुक्यातील ३, पालम तालुक्यातील ९ व गंगाखेड तालुक्यातील ६ गावांना झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे़ प्रत्यक्षात डिग्रस बंधाºयात परभणी जिल्ह्यासाठी फक्त ३३ टक्केच पाणीसाठा आरक्षित आहे़ उर्वरित ६७ टक्के पाणी नांदेड जिल्ह्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे़ या बंधाºयाचे संपूर्ण व्यवस्थापनही नांदेडच्या विष्णूपुरी प्रकल्प विभागाकडे आहे़ असे असतानाही या अहवाला मात्र नांदेडचा या प्रकल्पाच्या अनुषंगाने ओझरताही उल्लेख केलेला नाही़ त्यामुळे ही लपवाछपवी का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे़बांधकाम साहित्य बंधाºयातच पडून४सिंचन क्षमता वाढल्याचा दावा करणाºया पाटबंधारे विभागाने या बंधाºयाचे काम झाल्यानंतर या कामाचे वापरात नसलेले साहित्य उचलण्याची तसदी घेतली नाही़ त्यामुळे गेल्या आठ वर्षांपासून हे साहित्य बंधाºयातच पडून आहे़ परिणामी बंधाºयाची खोली पाण्याने वाढण्या ऐवजी साहित्यानेच वाढली आहे़ त्यामुळे पाणी साठ्यावर त्याचा परिणाम झाला आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प