लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : परभणी लोकसभा मतदारसंघात गुरुवारी विजय मिळविल्यानंतर शुक्रवारी सकाळी ११ वाजता खा.संजय जाधव यांना जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी पी. शिव शंकर यांच्या हस्ते विजयाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात गुरुवारी झालेल्या मतमोजणीत शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर यांचा ४२ हजार १९९ मतांनी पराभव केला होता. निकालाची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच दुपारी ४ वाजेच्या सुमारास खा.जाधव हे मतमोजणी केंद्रावर आले होते. यावेळीच खा. जाधव हे विजयी झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे तेथूनच त्यांची विजयी मिरवणूक सुरु झाली. ही मिरवणूक रात्री १० वाजेपर्यंत शहरात चालली. त्यामुळे गुरुवारी विजयाचे प्रमाणपत्र खा.जाधव यांना स्वीकारता आले नाही. त्यामुळे शुक्रवारी सकाळी ११ वाजता खा. जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. यावेळी जिल्हा कचेरीत त्यांना जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्या हस्ते विजयाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, महादेव किरवले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अभय चाटे, महानगराध्यक्ष आनंद भरोसे, मेघना बोर्डीकर, सुरेश भूमरे, अर्जून सामाले आदींची उपस्थिती होती.निकालावर पैजा४लोकसभेचा निकाल गुरुवारी रात्री ८ वाजता अधिकृतरित्या जाहीर झाला असला तरी सायंकाळी ४ वाजेपासूनच याबाबत जिल्हाभरात चर्चा सुरु होती. या निकालावर अनेकांनी पैजा लावल्या होत्या. त्यात काहींना यश आले तर काहींना अपयश आले.
परभणी : जाधव यांना विजयाचे प्रमाणपत्र केले प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:58 AM