- लक्ष्मण दुधाटे परभणी - पंधरा दिवसांपूर्वी वडील सूर्यकांत मुस्तापुरे यांच्या एका पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे वडिलांना भेटण्यासाठी शुभम यांना गावाकडे यायचे होते. सुटी मिळाल्यानंतर ते गावाकडे येणार होते, मात्र पित्याच्या भेटीपूर्वीच शुभम यांना वीरमरण आले.शुभम शहीद झाल्याचे त्यांच्या माता-पित्यास समजताच दोघांनीही हंबरडा फोडला. शुभम यांचा स्वभाव मनमिळावू होता. बसवेश्वर मुस्तापुरे यांना आठवणींना उजाळा देत असताना अश्रू आवरणे कठीण झाले. ते म्हणाले, गावातील युवकांना सशक्त करून लष्करात यावे यासाठी गावात व्यायामशाळा उभारण्याचे शुभम यांनी ठरविले होते. आई-वडिलांनी खूप कष्ट घेतले आहेत. त्यांना काम न करू देता आरामात ठेऊन लहान भावंडांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न करण्याचा मानस शुभम यांनी बोलावून दाखवला होता. त्यांच्या लग्नासाठी स्थळ येत होते. दोन वर्षांनी लग्न करून घर बांधण्याचे स्वप्न त्यांनी रंगविले होते.
पित्याच्या भेटीपूर्वीच वीरमरण, परभणीचा जवान शहीद; गावकऱ्यांचे डोळे पाणावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 4:31 AM