लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : परभणी-जिंतूर हा महामार्ग पाईपलाईनसाठी तालुक्यातील धर्मापुरी व टाकळी शिवारात दोन जागी खोदण्यात आला आहे़ खोदकामानंतर या खड्ड्यांमध्ये माती भरली जात असल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत़परभणी-जिंतूर या महामार्गावर वाहने चालविताना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे़ वाहनधारक वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्ता दुरुस्त करण्यासाठी साकडे घालत आहेत़ त्यातच परभणी तालुक्यातील धर्मापुरी व टाकळी शिवारात पाईपलाईन व रस्त्याच्या कामासाठी दोन जागांवर हा महामार्ग खोदला आहे़; परंतु, खोदकामानंतर त्यामध्ये मातीचा भराव टाकण्यात आला आहे़ हा मातीचा भराव टाकल्याने दोन-तीन दिवसांमध्ये खड्डे पडतात़ त्यामुळे वाहनधारकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे़ सा़बां़ ने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे़सा़बां़ विभाग मूग गिळून गप्पपरभणी-जिंतूर महामार्ग शहरातील विसावा चौक परिसरात असलेल्या कॅनॉलवरील पुलावर पूर्णपणे उखडला आहे़ त्याचबरोबरच धर्मापुरी शिवारात मोठमोठे खड्डे पडले आहेत़त्यातच परभणी तालुक्यातील धर्मापुरी व टाकळी शिवारात पाईपलाईनच्या कामासाठी दोन ठिकाणी हा महामार्ग खोदण्यात आला़; परंतु, या खड्ड्यांची दुरुस्ती करताना माती व मुरूमाचा भराव टाकण्यात आला़२० व २१ आॅगस्ट रोजी झालेल्या पावसामुळे ही माती वाहून गेल्याने मोठ मोठे खड्डे पडले आहेत़ परंतु, याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे़
परभणी-जिंतूर रस्ता :जलवाहिनीसाठी महामार्गाचे खोदकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2018 12:44 AM