शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

परभणी: विठू माऊलीच्या गजराने आषाढी एकादशीचा आनंद द्विगुणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:38 AM

पंढरीसी जावे आल्यानो संसारा।’ हा संत तुकाराम महाराजांचा अभंग उभ्या महाराष्ट्राच्या मनीमाणसी घर करुन आहे. याचा प्रत्यय पिढ्यान् पिढ्या आषाढी- कार्तिकीच्या वेळी प्रत्येकाला येत असतो. असाच काहीसा प्रत्यय शुक्रवारी जिल्हाभरात आषाढी एकादशीनिमित्त अबालवृद्ध भाविकांचा उदंड उत्साह पाहून आला. या निमित्ताने भाविकांच्या वतीने दिंडी काढण्यात आली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : ‘ पंढरीसी जावे आल्यानो संसारा।’ हा संत तुकाराम महाराजांचा अभंग उभ्या महाराष्ट्राच्या मनीमाणसी घर करुन आहे. याचा प्रत्यय पिढ्यान् पिढ्या आषाढी- कार्तिकीच्या वेळी प्रत्येकाला येत असतो. असाच काहीसा प्रत्यय शुक्रवारी जिल्हाभरात आषाढी एकादशीनिमित्त अबालवृद्ध भाविकांचा उदंड उत्साह पाहून आला. या निमित्ताने भाविकांच्या वतीने दिंडी काढण्यात आली होती.परभणी शहरातील माळीगल्ली येथील मारोती मंदिर येथे सकाळी विविध शाळांमधील विद्यार्थी जमा झाले. येथे विश्व हिंदू परिषदेच्या वतीने पालखीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ८ वाजता गोपाळ दिंडीला सुरुवात झाली. नारायण चाळ, गुजरी बाजार, गांधी पार्क, शिवाजी चौक, शिवाजी रोडमार्गे विद्यानगरातील माऊली मंदिरात या दिंडीचा समारोप झाला. या दिंडीत विठ्ठल-रुखमाईचे सजीव देखावे सादर करण्यात आले होते. चिमुकल्यांनी विविध वेषभूषा परिधान केल्या होत्या. शहरातील गुजरी बाजारात पालखी पोहचल्यानंतर येथे पालखीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर रिंगण सोहळा पार पडला. हा रिंगण सोहळा उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. यानिमित्त विविध राजकीय व सामाजिक संस्थांच्या वतीने दिंडीतील भाविकांचे स्वागत करण्यात आले. यावेळी विहिंपचे प्रांतमंत्री अनंत पांडे, सुरेंद्र शहाणे, संप्रिया पाटील, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, सचिन देशमुख, विजय जोशी, समीर दुधगावकर, अंबिका डहाळे, प्रल्हाद कानडे, राजकुमार भामरे, सुनील रामपूरकर, श्यामसुंदर कुलकर्णी, गोपाळ रोडे, श्यामसुंदर शहाणे, अभिजीत कुलकर्णी, सचिन कोमलवार, गणेश काळबांडे, प्रसाद कुलकर्णी, मनिष देशपांडे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :parabhaniपरभणीAshadhi Ekadashiआषाढी एकादशी