लोकमत न्यूज नेटवर्कमानवत : जगभरात धुमाकूळ घातलेल्या ‘पबजी गेम’च्या विळख्यात तालुक्यातील शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह युवक अडकले असून, या गेमममुळे युवकांचे मानसिक आरोग्य बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.मागील चार ते पाच महिन्यांपूर्वी ‘पबजी’ हा गेम स्मार्टफोनच्या दुनियेत दाखल झाला. दक्षिण कोरियामधील ब्ल्युव्हेल या कंपनीने पबजी गेमची निर्मिती केली आहे. यापूर्वी संगणक गेम्सच्या विश्वात काऊंटर स्ट्राईक तसेच फ्रीफायर या गेमने वेड लावले होते. त्याच सारखी साधर्म्य असलेली वैशिष्ट्ये पबजी गेममध्ये असल्याने युवक व लहान मुलामध्ये त्यांची क्रेझ वाढली आहे.शहरातील चौकाचौकात, गल्ली बोळासह शाळा महाविद्यालयाच्या परिसरात हा गेम तरुण खेळताना दिसत आहेत. लहान मुले विरंगुळा म्हणून न खेळता तासंतास खेळतानाचे चित्र ग्रामीण भागातही दिसत आहे. अभ्यास व काम बाजूला ठेऊन हा गेम खेळला जात असल्याने पालकाची डोकेदुखी वाढली आहे.या गेमची सवय लागल्याने खेळल्याशिवाय चैन पडत नसल्याचे चित्र जिल्हाभरासह तालुक्यात दिसून येत आहे. मुलांवर या पबजी गेमचा विपरीत परिणाम होत आहे. यामुळे पालकांनी लक्ष देऊन मुलांना वेळीच आवर घालणे गरजेचे आहे. या गेमपासून मुलांना दूर ठेवणे आवश्यक आहे. त्याच बरोबर पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.एकाच वेळी चार जण खेळू शकतात..यामध्ये चार मित्राना सोबत घेउन आॅनलाईन गेम खेळला जातो. प्रोफाइल तयार केल्यानंतर सुरवातीला एका मॅपवर विमानाद्वारे उतरविले जाते. त्यावेळी तुमच्या आंगावर फारसे कपडे नसतात. त्या प्रदेशात सगळ्याचा शोध घ्यावा लागतो. जशी जशी लेव्हल पुढे जाते. तशी बंदूक, बॉम्ब, जॉकेट, मेडीकल किट, बँडेज, एनर्जी ड्रिक्स, चारचाकी गाडी व इतर वस्तू मिळतात. समोर साधारणपणे १०० वर अधिक शत्रू असतात त्याचा खात्मा करुन गेम जिंकता येतो. या गेममध्ये आपल्या मित्रांना वाचविता येते. तसेच गेम जिंकल्यावर चिकन डिनरचा मॅसेज येतो. वेगवेगळ्या प्रकारचे मॅप असल्याने आवडीप्रमाणे गेम खेळता येतो. आठ मिनिटापासून ते अर्ध्यातासापर्यंत हा गेम चालतो. खेळत असताना आॅडिओ मॅसेजद्वारे संवाद साधता येतो. एकाच गेममध्ये अनेक गोष्टी असल्याने मुलांमध्ये क्रेझ वाढत चालली आहे.पालकांची वाढली डोकेदुखीदेशातच नव्हे जगभरात धुमाकुळ घातलेल्या पबजी या व्हिडीओ गेममध्ये महाविद्यालयीन तरुण आणि शालेय विद्यार्थी अडकले आहेत. तासन्तास दिवस-रात्र हा गेम खेळत आहेत. यावर विपरित परिणाम होत आहे. गेमची सवय (डिक्सन ) झाल्याने खेळल्याशिवाय चैन पडत नसल्यामुळे युवकवर्ग दिवसरात्र हा गेम खेळत असल्याचे चित्र ग्रामीण भागासह तालुक्यात दिसून येत आहे.४यामुळे पालक मात्र त्रस्त झाले असून त्यांची डोकेदुखी वाढली आहे. यावर उपाय काय, असा प्रश्न पालकांपुढे उपस्थित होत आहे.दूर राहिलेलेच बरेया गेममध्ये ग्राफिक्स उत्तम असून विविध वैशिष्ट्ये असल्याने खेळण्याची आवड निर्माण होते. मात्र या गेमची सवय लागत असल्याने अनेकदा हा गेम स्वस्थ बसू देत नाही. आणखी एकदा पबजी गेम खेळावा असे वाटते. त्यामुळे हा गेम पुन्हा पुन्हा खेळला जात आहे. या गेमची सवय होण्यापूर्वीच या गेमपासून दूर गेलेले बरे, असे हा गेम खेळणाऱ्या तरुणांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
परभणी : तरुणाईला जडले ‘पबजी गेम’चे व्यसन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2019 12:38 AM