लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे थकलेले देयक अदा करावे, या प्रमुख मागणीसाठी २३ जुलै रोजी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले़परभणी जिल्ह्यातील दूध उत्पादक संस्थांचे दोन महिन्यांपासूनचे देयक थकले आहे़ जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, पाणी, चारा टंचाईबरोबरच रोजगाराचा प्रश्न सतावत आहे़ काही शेतकऱ्यांनी यावर मात करीत दूध व्यवसाय सुरू केला़ शासकीय दूध डेअरीला दूध विक्री करूनही त्याचे देयक मिळत नसल्याने या शेतकºयांवर आर्थिक संकट कोसळले आहे़ जनावरे जगविण्यासाठी चारा विकत घ्यावा लागत आहे़चाºयाच्या किंमतीही गगनाला भिडल्या आहेत़ अशा परिस्थितीमध्ये दुधाचे देयक थकविणे म्हणजे शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला़ तसेच चाºयाच्या टंचाईमुळे जनावरांना सकस आहार मिळत नाही़ ओला चारा शिल्लक नसल्याने दुधामध्ये प्रोटीन्सचे प्रमाण कमी येत आहे़ ही बाबही यावेळी आंदोलकांनी निदर्शनास आणून दिली़ तीन महिन्यांचे थकलेले ७ कोटी रुपये शेतकºयांना वितरित करावेत, दुष्काळी कालावधीसाठी विशेष बाब म्हणून ८़५ टक्के एस़एऩएफ़ असलेल्या गायीच्या दुधाला २़५५ टक्के प्रोटीन असलेले दूध शासकीय व खाजगी डेअरीमध्ये खरेदी करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली़या आंदोलनात किसान सभेचे कॉ़ विलास बाबर, अंगद मोरे, शुभम वाघ, माधव तिडके, गंगाधर जवंजाळ, निवृत्ती काळदाते, कृष्णा घोडगे, शंकर मोहिमे यांच्यासह शाश्वत दूध उत्पादक संस्था दामपुरी, प्राप्ती दूध उत्पादक संस्था फुकटगाव, तुळजाई दूध उत्पादक संस्था आरळ, पद्मावती दूध उत्पादक संस्था जवळा, नृसिंह दूध उत्पादक संस्था दामपुरी, संत हरिबाबा महाराज दूध उत्पादक संस्था लोहगाव या संस्थांचे सदस्य, दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़दूध संकलनात झाली घट४परभणी जिल्ह्यात दूध संकलन वाढले आहे़ सुमारे १५० दूध सहकारी संस्थांच्या माध्यमातून शासकीय दूध डेअरीला दूध पुरवठा केला जातो़ दररोज ७० हजार लिटर दुधाचे संकलन या डेअरीत होते़ ते आता २७ हजारांवर येऊन पोहोचले आहे़ यावरून या व्यवसायाला फटका बसल्याचे दिसत आहे़४शासकीय दूध डेअरीला पुरवठा करणाºया दूध सहकारी संस्थांना या योजनेमार्फत प्रत्येक दहा दिवसांना पेमेंट दिले जाते़ परंतु, १८ मेपासून जिल्ह्यातील दूध सहकारी संस्थांची देयके रखडली आहेत़ त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत़घोषणा होऊनही मिळेनात बिले४शासकीय दूध डेअरीत रखडलेली दूध उत्पादक संघाची देयके देण्यासाठी निधीची तरतूद केल्याची घोषणा १५ दिवसांपूर्वी करण्यात आली आहे़ विशेष म्हणजे दूध संकलनासाठी ५६ कोटी रुपयांचे अनुदानही मंजूर करण्यात आले आहे़ परंतु ही घोषणा झाली असली तरी प्रत्यक्षात रक्कम हाती पडली नसल्याने दूध उत्पादकांमध्ये नाराजीचा सूर आहे़ शासनाने थकलेले पेमेंट त्वरित अदा करावे तसेच पुढील बिलांसाठीही निधीची तरतूद करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली़
परभणी : दुधाच्या थकीत देयकासाठी किसान सभेचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:22 AM