मारोती जुंबडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : गाव पातळीवरील महसूल विभागाची कामे सुरळीत पार पाडावीत, यासाठी राज्य शासनाने परभणी तालुक्यात जवळपास ३५ कोतवालांची नियुक्ती केली़ मात्र मागील काही दिवसांपासून परभणी तहसील कार्यालयांतर्गत येणाऱ्या कोतवालांना रात्रपाळी व सुटीच्या दिवशी तहसील कार्यालय राखण्याच्या कामासाठी नियुक्त करण्यात आले आहे़ त्यामुळे सद्यस्थितीत परभणी तालुक्यातील कोतवाल पहारेकरी, चौकीदार बनल्याचे दिसून येत आहे़कोतवाल हे महसूल खात्यातील सर्वात कनिष्ठ पद आहे़ कोतवालांना तलाठी, पोलीस पाटील व ग्रामस्थ यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून ओळखले जाते़शासकीय रक्कम शासकीय तिजोरीत भरण्यास सहाय्य करणे, शेत सारा, शासकीय देणे अदा करण्यासाठी ग्रामस्थांना चावडीवर बोलावून आणणे, शासकीय पैसा, कार्यालयीन कागदपत्रे आणि शासकीय वसुली म्हणून जप्त केलेल्या मालमत्तेवर लक्ष ठेवणे, जप्त केलेली मालमत्ता, जनावरे चावडीवर घेऊन जाणे, आवश्यकतेनुसार गाव दप्तर तहसील कार्यालयात आणणे, तहसील कार्यालयाचे टपाल चावडीवर आणणे, गावात आलेल्या शासकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या दौºयात, पीक पाहणीत हद्दीच्या खुणा तपासण्यास मदत करणे, नोटीस, समन्स बजावण्यासाठी पोलीस पाटलांना मदत करणे, गावातील जन्म-मृत्यू, लग्न आणि अर्भक मृत्यूची माहिती सचिवांना देणे, शासनाच्या आदेशाबाबत गावात दवंडी देणे आदी २० प्रकारची कामे कोतवालांकडून केली जातात़ या कामांसाठी चौथीपर्यंत शिकलेल्या उमेदवारांची ५ हजार रुपये मानधनावर तहसीलदार नियुक्ती करतात़ परभणी तहसील कार्यालयांतर्गत जवळपास २८ नवीन कोतवाल व जुने १२ असे ४० कोतवाल कार्यरत आहेत़या सर्व कोतवालांना सध्या कार्यालयीन कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी तहसीलदार विद्याचरण कडावकर यांनी १५ कोतवालांची रात्र पाळीच्या कामासाठी पहारेकरी म्हणून रोटेशन पद्धतीने एका-एका महिन्यासाठी नियुक्ती केली आहे़ यामध्ये सायंकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत रात्र पाळीला काम करावे लागेल, अशी नोटीस काढली आहे़ विशेष म्हणजे, सुटीच्या दिवशी तहसील कार्यालय सांभाळावे, असेही या नोटिसीत नमूद केले आहे़ त्यामुळे गाव पातळीवरील कामे करण्यासाठी नियुक्त केलेल्या कोतवालांना तुटपुंज्या मानधनावर तहसील कार्यालयात पहारेकºयांचे कामे करावे लागत आहे़ त्यामुळे कोतवाल मानसिक तणावाखाली आहेत़ कोतवालांना नेमून दिलेली कामे रद्द करून गाव पातळीवरील कामे द्यावीत, अशी मागणी कोतवाल कर्मचाºयांतून होत आहे़गाव पातळीवर मिळेनात कोतवाल४राज्य शासनाने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रक्रिया सुरू आहे़४या योजनेमध्ये अर्ध्याहून अधिक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत़ त्यामुळे शासनाच्या या लोककल्याणकारी योजनेची माहिती शेतकºयांना देण्यासाठी गाव पातळीवर कोतवाल हा महत्त्वाची भूमिका पार पाडतो़४मात्र परभणी तालुक्यातील गावांसाठी निवड केलेल्या कोतवालांची रवानगी तहसीलमधील कार्यालयांतील कामासाठी केल्याने गाव पातळीवर कोतवाल दिसून येत नाहीत़तहसील कामांचा भारही कोतवालांवरच४परभणी तहसील कार्यालयांतर्गत पहारेकरी, चौकीदार या कामांबरोबरच तहसील कार्यालयातील नक्कल देणे, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या समस्या जाणून घेणे, लिपिकांचीही कामे करावी लागत आहेत़ विशेष म्हणजे, या कोतवालांना तहसीलदारांच्या नावाखाली इतर कर्मचारीही काम करून घेण्यासाठी त्रास देत आहेत़ त्यामुळे तुटपुंज्या मानधनावर एक प्रकारे कोतवालांची पिळवणूकच केली जात असल्याचे दिसून येत आहे़परिस्थितीनुसार मनुष्यबळाचे नियोजन करण्यात येते़ परभणी तहसील कार्यालयात मनुष्यबळ कमी असल्याने कोतवालांना ही कामे दिली आहेत़ ग्रामीण भागातील कामांवर परिणाम होणार नाही, अशाच पद्धतीने नियोजन करून कोतवालांना कामे दिली आहेत़-विद्याचरण कडावकर, तहसीलदार
परभणी : कोतवाल बनले चौकीदार, पहारेकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2020 10:45 PM