शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

परभणी : मजुरांना मुबलक कामे; स्थलांतर नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 11:55 PM

गंभीर दुष्काळामध्ये होरपळणाऱ्या मजुरांच्या हाताला काम नसल्याने त्यांचे शहरांकडे स्थलांतर झाल्याचा ‘आॅन दी स्पॉट रिपोर्ट’, ‘लोकमत’ ने प्रसिद्ध करुनही या संदर्भात उपस्थित करण्यात आलेल्या तारांकित प्रश्नावर रोहयोमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मुबलक कामे उपलब्ध आहेत. त्यामुळे मजुरांचे स्थलांतर होण्याचा प्रश्नच नाही, असे लेखी सरकारी ठेवणीतील उत्तर सोमवारी सभागृहात दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : गंभीर दुष्काळामध्ये होरपळणाऱ्या मजुरांच्या हाताला काम नसल्याने त्यांचे शहरांकडे स्थलांतर झाल्याचा ‘आॅन दी स्पॉट रिपोर्ट’, ‘लोकमत’ ने प्रसिद्ध करुनही या संदर्भात उपस्थित करण्यात आलेल्या तारांकित प्रश्नावर रोहयोमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मुबलक कामे उपलब्ध आहेत. त्यामुळे मजुरांचे स्थलांतर होण्याचा प्रश्नच नाही, असे लेखी सरकारी ठेवणीतील उत्तर सोमवारी सभागृहात दिले.परभणी जिल्ह्यात गतवर्षी समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे खरीप व रबी या दोन्ही हंगामात शेतकऱ्यांच्या हाती काहीही लागले नाही. पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने नागरिकांना भटकंती करावी लागली. उन्हाळ्यात जवळपास दीडशे टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला गेला. दुष्काळामुळे हाताला कामच नसल्यामुळे ग्रामस्थांचे शहरांकडे स्थलांतर झाले. या संदर्भात प्रातिनिधीक स्वरुपात १४ मे रोजीच्या अंकात ‘लोकमत’ने गंगाखेड तालुक्यातील खोकलेवाडी या गावाचा ‘आॅन दी स्पॉट रिपोटर्’ प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये या गावातील अडीचशेपेक्षा अधिक ग्रामस्थांनी रोजगारासाठी स्थलांतर केल्याची बाब अधोरेखित करण्यात आली होती. या संदर्भात सदरील गावातील ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या होत्या. तसेच २०० कुटुंब संख्येच्या या गावात ८०० मजुरांची रोहयो संदर्भात नोंदणी आहे; परंतु, कामचे उपलब्ध नसल्याने येथील मजुरांनी पुणे, हैदराबाद, औरंगाबाद, गंगाखेड शहराकडे स्थलांतर केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले होते.विशेष म्हणजे, रोहयो विभागाने मात्र त्यावेळी जिल्ह्यात २९ हजार मजूर कामावर असल्याचे सांगून ७२४ कामे जिल्ह्यात सुरु असल्याचे नमूद केले होते. कागदी घोडे नाचविणाºया प्रशासकीय यंत्रणेचा पंचनामा ‘आॅन दी स्पॉट रिपोर्ट’ च्या माध्यमातून ‘लोकमत’ने केला होता. या पार्श्वभूमीवर आ.बाबाजानी दुर्राणी यांच्यासह विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे व इतर आमदरांनी या संदर्भात विधानपरिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यामध्ये राज्यातील ग्रामीण भागात कृषी आणि संलग्न क्षेत्राशी निगडित असलेल्या बेरोजगारांची संख्या वाढली असून शेतीवर अवलंबून असलेल्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे, हे खरे आहे का? असल्यास राज्यातील अर्धकुशल व बेरोजगार मजुरांना काम मिळत नसल्याने इतर राज्यात कामासाठी त्यांचे स्थलांतर होत आहे, हे खरे आहे का? असल्यास कृषी आणि संलग्न क्षेत्राशी निगडित असलेल्या मजुरांना व अर्धकुशल मजुरांना राज्यात पुरेस्या प्रमाणात काम मिळवून देण्याबाबत शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे? असे प्रश्न केले होते. या प्रश्नावर लेखी उत्तर देताना रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मजुरांवर उपासमारीची वेळ आल्याचे म्हणणे खरे नाही. शिवाय कामासाठी त्यांचे स्थलांतर होत नाही, असे सांगून महात्मा गांधी राष्ट्रीय हमी योजनेंतर्गत राज्यामध्ये कृषी व संलग्न क्षेत्रात पुरेस्या प्रमाणात कामाचे नियोजन केलेले आहे. त्यामुळे मजूर स्थलांतरित होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मजुरांना पुरेस्या प्रमाणात कृषी, सामाजिक वनीकरण, वनविभाग, रेशीम उद्योगअंतर्गत अनेक वैयक्तिक शेतकºयांच्या शेतावर तसेच सामूहिक स्वरुपाची कामे अकुशल मजुरांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे, असे या उत्तरात क्षीरसागर यांनी म्हटले आहे. क्षीरसागर यांनी हे शासकीय पठडीतील लेखी उत्तर दिले असून प्रत्यक्ष फिल्डवर काय स्थिती होती, याची माहिती घेण्यात आली नाही. त्यामुळे शेतीवर अवलंबून असलेल्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली नाही, असा रोहयोमंत्र्यांचा दावा फोल ठरत आहे.जिंतूर, गंगाखेडमध्ये : अधिक स्थलांतर४दुष्काळी परिस्थितीमुळे हाताला काम नसल्यामुळे जिंतूर व गंगाखेड तालुक्यातील मजुरांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाल्याची बाब उन्हाळ्यात निदर्शनास आली होती. हे मजूर कामासाठी पुणे, मुंबई, हैदराबाद आदी ठिकाणी स्थलांतरित झाले.४ विशेष म्हणजे दुष्काळामुळे शेतीत काम नसल्याने त्यांना शासनाने विशेष अनुदानाच्या धर्तीवर विशेष भत्ता देणे आवश्यक होते; परंतु, मजुरांचे संघटन नसल्याने त्यांना दुष्काळग्रस्तांच्या कुठल्याही सुविधा मिळत नाहीत. परिणामी दुष्काळाने होरपळणाºया जनतेला दिलासा देण्याचा शासनाकडून केला जाणारा दावा फोल ठरत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळWaterपाणीEmployeeकर्मचारी