विजय चोरडिया।लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी) : ऐन दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अत्यल्प पाणीसाठा असताना येलदरीसह तालुक्यातील ७० पेक्षा जास्त तलावांतून अवैध पाणी उपसा सुरू आहे. त्यामुळे भविष्यातील पाणीटंचाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.जिंंतूर तालुक्यातील येलदरी धरणासह जि.प.च्या लघूसिंचन विभागाचे ५७ गाव तलाव व पाझर तलाव आहेत. पाटबंधारे विभागांतर्गत १३ गाव व सिंचन तलाव आहेत. तालुक्यात येलदरीसह ३० ते ३५ गाव व पाझर तलावात २० ते २५ टक्के पाणीसाठा आहे. येलदरी धरणात केवळ ९ टक्के पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा भविष्यात पुरेल, याची शाश्वती नाही. परिणामी भविष्यातील तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.येलदरी धरणासह पूर्णा नदीवर जवळपास १ हजार पेक्षा जास्त कृषीपंप सुरू आहेत. यातून मोठा पाणी उपसा होत आहे. शिवाय ठिकठिकाणी असलेले बंधाऱ्यावरही मोठ्या प्रमाणावर मोटारी आहेत. विशेष म्हणजे, या भागातील शेतीही याच पाण्यावर अवलंबून असते. यावर्षी पाणीसाठा कमी असल्याने रबीसाठी पाणी मिळणार का? रबी पेरणी करावी का? या द्विधा मन:स्थितीत येथील शेतकरी आहेत, अशा वेळी पाटबंधारे विभागाने आपली भूमिका व रबीसाठीचे धोरण जाहीर करणे गरजेचे आहे.अन्यथा या भागातील शेतकरी पेरणी करून बसतील आणि नंतर पाटबंधारे विभाग शेतकºयांच्या मोटारी जप्त करतील. त्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान होणार आहे. तालुक्यातील २० ते २५ गाव व पाझर तलावात जेमतेम पाणीसाठा आहे. या तलावावर मोटारी सुरू असल्याने तलावातील पाणी झपाट्याने कमी होत आहे. भविष्यात पिण्यासाठी पाणी मिळणे अवघड असल्याने अवैधरित्या सुरू असलेल्या विद्युत मोटारी तातडीने बंद कराव्यात, अशी मागणी होत आहे.५० योजना येणार अडचणीतयेलदरी धरणात कमी पाणीसाठा असल्याने जिंतूर, वसमत, परभणीसह ग्रामीण भागातील ५० योजना अडचणीत सापडल्या असून यावर्षी तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.चाºयाचा प्रश्न गंभीर४यावर्षी कमी पावसामुळे ग्रामीण भागात जनावरांचा चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर असून त्यासाठी सर्व तलावातील पाणी आरक्षित ठेवणे गरजेचे आहे. तरच जनावरांना चारा व पाणी मिळू शकते.शेतकºयांनी रबी हंगामात पेरणी करू नये, पूर्णा नदीवरील सर्व मोटारी बंद करून वीजपुरवठा खंडित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवाय वर्तमानपत्रात प्रगटन देऊन शेतकºयांनी रबी पेरणी करू नये, असे आवाहन केले आहे.-पी.डी. मामिडवाड,कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभागलघू सिंचन विभागांतर्गत गाव तलावावर असणाºया मोटारी बंद करण्यासाठी पथकामार्फत कारवाई सुरू आहे. चारठाणा, जांब, रायखेडा, जुनूनवाडी आदी ठिकाणच्या मोटारी बंद करण्यात आल्या असून इतर ठिकाणच्या मोटारी तत्काळ बंद करण्यात येतील.-डी.ई. टणे, उपविभागीय अभियंता, पाटबंधारे विभाग
परभणी : येलदरीसह ७० तलावांतून अवैध पाणी उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 12:36 AM